शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 13:51 IST

Fraud Case : यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्या महिलांना शोधण्याचे आवाहन केले आहे.

मेकअप करून घेतल्यानंतर दोन महिलांनी पैसे न देता ब्युटी पार्लरमधून पलायन केले. तिच्या या कृत्याबद्दल ब्युटी पार्लरच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली आहे. यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्या महिलांना शोधण्याचे आवाहन केले आहे.जेड अ‍ॅडम्स असे या पार्लरच्या मालकाचे नाव आहे. 28 वर्षीय अ‍ॅडम्सने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी दोन महिला तिच्या ब्युटी पार्लरमध्ये आल्या होत्या. त्यांनी स्वतःची आई-मुलगी अशी ओळख करून दिली. दोघींनी मेकअपसह बोटॉक्स उपचार आणि इतर महागड्या उपचार घेतले. पण जेव्हा 48,942 रुपये बिल भरण्याची वेळ आली तेव्हा त्या रफूचक्कर झाल्या.ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या जेड अ‍ॅडम्सने फेसबुकवर महिलेचा फोटो शेअर करताना लिहिले, कृपया चोराचा फोटो शेअर करत आहे. दुर्दैवाने ही महिला आणि तिची मुलगी काल माझ्या क्लिनिकमध्ये सौंदर्य उपचारासाठी आल्या होत्या. पण पैसे न देता ती पळून गेली. अ‍ॅडम्सने सांगितले की, त्या दोघी ज्या पद्धतीने बोलत होत्या त्यावरून ते आयरिश नागरिक वाटत होते.जेड अ‍ॅडम्सची फेसबुक पोस्टयाप्रकरणी अ‍ॅडम्स यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, दोन्ही महिलांनी क्लिनिकमध्ये उपचारासाठी (बोटॉक्स आणि लिप फिलर) बुक केले, नंतर मेकअप केला आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्या बहाण्याने बाहेर गेल्या आणि परत आल्या नाहीत. अ‍ॅडम्सच्या म्हणण्यानुसार, त्यांचे बिल 48 हजार रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

अशा प्रकारे क्लिनिकमधून पळून गेलाअ‍ॅडम्स  सांगतात की, आधी एका महिलेने तिचे उपचार करून घेतले आणि ती वेटिंग एरियामध्ये बसली. दुसऱ्या महिलेनेही उपचार करून घेतल्यानंतर पहिल्या महिलेला पैसे भरण्यासाठी फोन करण्यासाठी ती वेटिंग एरियामध्ये आली, मात्र काही वेळातच दोघेही तेथून गायब झाले. तिने पार्लरमध्ये एक बॅग सोडली होती, जेणेकरून लोकांना वाटेल की, ती परत येणार आहे. पण तो फक्त बनाव होता.'मेट्रो यूके'च्या रिपोर्टनुसार, अॅडम्सने सांगितले की, ती 18 महिन्यांपासून क्लिनिक चालवत आहे, परंतु असे ग्राहक तिने कधी पाहिले नाहीत. फसवणूक करणाऱ्या महिलांना पकडण्यासाठी अॅडम्सने पोलिसांकडे मदत मागितली आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसInternationalआंतरराष्ट्रीय