शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला छेडणाऱ्या  रोड ‘रोमिओ’ ला आई ने दिला चोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:30 IST

वारंवार सांगुनही नाद न सोडल्याने घेतले दुर्गेचे रुप घेत भररस्त्यात बडवले..

ठळक मुद्देभररस्त्यात बडवले : वारंवार सांगुनही नाद न सोडल्याने घेतले दुर्गेचे रुप तीन महिन्यापुर्वीही खाल्ला मार 

वडगाव निंबाळकर : रोडरोमिओपासून मुलीला वाचवण्यासाठी बुधवारी एका आईने भररस्त्यात त्याला झोडपून काढले. वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे बसस्थानक परिसरात बुधवारी (दि. ११) सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.     गेल्या काही दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगा मुलीची छेड काढत होता. मुलीला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलगा करीत होता. याबाबत पालकांनी चौकशी केल्यानंतर मुलीने त्रास देणाऱ्या मुलाचे नाव सांगितले. संबंधित मुलाला मुलीची आई असे करु नकोस असे वारंवार सांगत होती. मात्र ,तो काही केल्या ऐकत नव्हता. त्याच्याबाबत तक्रारीही आल्या होत्या, येत होत्या. सर्व काही सांगूनही मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर अखेर मुलीच्याच आईने 'दुर्गे'चे रुप धारण करीत संबंधित मुलाला रस्त्यात बदडून काढत पोलिस ठाण्यामध्ये आणले. ही माहिती मुलाच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिस ठाणे गाठुन माफी मागत प्रकरण मिटवले. चोप दिलेल्या मुला बाबत अनेक वेळा तोंडी तक्रारी झाल्या होत्या. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत या मुलाचा वावर सतत बसस्थानक, शाळा परिसरामध्ये असतो. अशावेळी रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. ..............

तीन महिन्यापुर्वीही खाल्ला मार गेल्या तीन महिन्यापुर्वीही वाटेत अडवून एका मुलीची छेड काढल्याने या मुलाला संबंधित पालकांनी चोप दिला होता. दोन वेळा मार खाऊनही मुलगा सुधारत नसल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यामधून इतरांनाही जरब बसेल, असे प्रकार पुन्हा घडु नयेत.याबाबत ठोस पावले उचलण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. ................याबाबत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित प्रकाराबाबत कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. - सोमनाथ लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे.———————————

  

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस