शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकी हल्ला प्रकरण : ‘त्या’ सोन्याच्या गंठनावर होते लक्ष, अल्पवयीनला पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:30 IST

Robbery Case : त्यावर या चोरटयांची नजर पडली होती आणि ते चोरण्याच्या उद्देशाने मायलेकींवर प्राणघातक हल्ला करीत दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहीती तपासात समोर आली आहे.

कल्याण -  घरात घुसून दोघा चोरटयांनी वत्सला चिकणे आणि तिची विवाहीत मुलगी सारीका चव्हाण हिच्यावर हल्ला करीत दागिने, रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री मध्यरात्री अटाळी मानी येथे घडली होती. या प्रकरणातील दोघांपैकी एका अल्पवयीनला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी सारीकाने मोठया आकाराचे सोन्याचे गंठन घातले होते. त्यावर या चोरटयांची नजर पडली होती आणि ते चोरण्याच्या उद्देशाने मायलेकींवर प्राणघातक हल्ला करीत दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहीती तपासात समोर आली आहे.

वत्सला चिकणे यांच्या शेजा-याने माघी गणेशाची स्थापना केली होती. त्यानिमित्ताने वत्सला यांची मुलगी सारिका चव्हाण ही देखील तीच्या दोन मुलांसोबत माहेरी आली होती. मध्यरात्री वत्सला आणि सारिका व तिची मुले घरात झोपले असताना चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात दोन जण घुसले. दरम्यान त्याचवेळेला वत्सला यांना जाग आल्याने त्या उठल्या. चोरटे त्यांच्या निदर्शनास पडताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी वत्सला यांच्या डोक्यावर चोरटय़ांनी कोणत्यातरी वस्तूने प्रहार केला. यावेळी झालेल्या आवाजाने मुलगी सारीका ही देखील जागी झाली. सारीकाने चोरटय़ांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटयांनी तीला ही मारहाण केली होती. चोरटयांच्या हल्ल्यात दोघी जखमी झाल्या होत्या. चोरटयांच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती.सीसीटिव्हीत चोरटे कैदज्याठिकाणी चोरीची घटना घडली त्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. यात दोन मुल दुचाकीवरून जाताना आढळुन आली. त्याआधारे गुन्हयाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. दोघांपैकी एकाला पकडले आहे दुस-याचा शोध सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरीkalyanकल्याण