शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 09:19 IST

1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेतया मोस्ट वाँटेंड आरोपीचे नाव अबू बकर असे आहे. आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईस्थित घरात शिजलेल्या बॉम्बस्फोेटाच्या कटामध्ये अबू बकर सहभागी होता

दुबई - 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील  मोस्ट वाँटेड आरोपीला अन्य एका आरोपीसह दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या मोस्ट वाँटेंड आरोपीची ओळख अबू बकर अशी पटली असून, त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतले होते. तसेच आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईस्थित घरात शिजलेल्या बॉम्बस्फोेटाच्या कटामध्ये तो सहभागी होता. दरम्यान, अबू बकरला झालेली अटक हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अबू बकर हा मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाची आखणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बऱ्याच काळापासून मोस्ट वॉटेंड गुन्हेगारांच्या यादीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अबू बकरचे संपूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख आहे. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती.   अबू बकर याच्या विरोधात 1997 साली रेड कॉर्नर नोटीस जारी झाले होते. तेव्हापासूनच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. अखेर आता त्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. अबू बकर याचे दुबईत अनेक उद्योगधंदे असून, त्याने एका इराणी महिलेशी विवाह केला आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाती अन्य एक आरोपी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली असून, मुस्तफा डोसा याचा 2017 साली मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबई