शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
3
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
4
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
6
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
7
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
8
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
9
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
10
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
11
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
12
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
13
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
14
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
15
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
16
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
17
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
18
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
19
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
20
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

सोशल मीडियावरील मित्रांकडून सर्वाधिक बलात्कार; मुंबई पोलिसांचा धक्कादायक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 05:36 IST

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी वार्षिक अहवाल सादर केला.

मुंबई : गेल्या तीन वर्षात मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणांकडून सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या वार्षिक अहवालातून समोर आली. यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना सतर्क राहण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत.  

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी सहआयुक्त मिलिंद भारांबे (गुन्हे), विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था), निकेत कौशिक (आर्थिक गुन्हे शाखा), राजकुमार व्हटकर (प्रशासन) यांच्यासह पाचही अपर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त हजर होते. यावेळी  हेमंत नगराळे यांनी गुन्ह्याचा लेखाजोखा मांडला. 

गेल्या वर्षभरात मुंबईत बलात्काराच्या ८८८ घटनांची नोंद झाली. यामध्ये ५३४ गुन्हे हे अल्पवयीन मुलींशी संबंधित होते. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षात मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तीकडून सर्वाधिक मुली, तरुणी विकृत वासनेच्या शिकार ठरत असल्याचे समोर आले. गेल्यावर्षी २९९ अल्पवयीन मुलींसह २७१ तरुणी आरोपींच्या जाळ्यात अडकल्या. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वावर वाढला. यातूनही या गुन्ह्यात भर पडत असल्याचा अंदाजही पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. 

२३ महिलांवर वडील, भाऊ तसेच मुलाकडून लैंगिक अत्याचाराच्या नात्याला काळिमा फासण्याचा घटना घडल्या आहेत. नातेवाईक (४२), कुटुंबातील मित्र (५१), लिव्ह इन पार्टनर (९), केअरटेकर (१) तसेच अन्य ओळखीच्या व्यक्तीकडून (२८) बलात्काराच्या घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे. त्यामुळे महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

गेल्यावर्षी मुंबईत ६४,६५६ गुन्ह्यांची पोलीस दफ्तरी नोंद झाली. यापैकी ५३,१९३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये हत्या (१६२), हत्येचा प्रयत्न (३४९), दरोडा (१६), खंडणी (१४९), घरफोडी (१६८३), चोरी (४५३४), वाहन चोरी (३२८२) गुन्ह्याचा समावेश आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसHemant Nagraleहेमंत नगराळे