शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहर आयुक्तालयात बनावट फेसबुक अकाउंट बनवणाऱ्यांविरोधात सर्वाधिक गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 05:05 IST

Crime News : सोशल मीडियाद्वारे मैत्री करून नंतर गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूकही केली जाते.

- जितेंद्र कालेकर

ठाणे :   सोशल मीडियावर अश्लील मेसेज किंवा व्हिडीओ क्लिप टाकून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत, लैंगिक अत्याचार करण्याचे किंवा पैसे उकळण्याचे अनेक प्रकार उघडकीस  आले आहेत. दोन वर्षांत अशा २५ महाभागांना अटक केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.    गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे अश्लील शिवीगाळ करून आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो फेसबुकवर प्रसारित करणाऱ्या सुनील रायभान पवार उर्फ सुनील राजे पवार (२८) याला औरंगाबाद येथून ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे.           सोशल मीडियाद्वारे मैत्री करून नंतर गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूकही केली जाते. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्याचेही प्रकार घडतात. अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी केले आहे.

गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय?सायबर गुन्ह्यांसंबंधी २०१९ मध्ये ठाणे आयुक्तालयात ६० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. १८ आरोपींना अटक झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ४६ गुन्हे नोंद झाले. नऊ गुन्हे उघड झाले असून, सात जणांना अटक केल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

वर्षात सर्वाधिक गुन्हे कुठले घडले?वर्षभरात सायबर सेलमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये फेसबुकवर अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याचे प्रमाण अधिक होते. याशिवाय, फेसबुकवर बनावट खाते सुरू करून खातेधारक आजारी किंवा अडचणीत असल्याची बतावणी करीत, त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली जाते. 

कुठल्या महिन्यात सर्वाधिक गुन्हे?महिना    गुन्हे संख्याजानेवारी    ६फेब्रुवारी    ५मार्च    ३एप्रिल     ४मे    ६जून    १जुलै    १ऑगस्ट    ०सप्टेंबर     ५ ऑक्टोबर    ९नोव्हेंबर    ६

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे