शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; अनिल देशमुखांच्या याचिकेवर 29 सप्टेंबरला होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 09:17 IST

ईडीने बजावलेले पाचही समन्स रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राजकीय सुडातून ही कारवाई करण्यात आल्याचे देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे.

मुंबई : मनी लॉन्ड्रिगप्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या याचिकेवर २९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेऊ, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. ईडीला आवश्यकता वाटल्यास त्यांनी अनिल देशमुखांच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटले.ईडीने बजावलेले पाचही समन्स रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राजकीय सुडातून ही कारवाई करण्यात आल्याचे देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे. गुरुवारच्या सुनावणीत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले की, या याचिकेवर ऑनलाइन सुनावणी घ्यावी. कारण सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांना ईडीच्यावतीने युक्तिवाद करता येईल. दरम्यान, देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी व अनिकेत निकम यांनी गुरुवारीच सुनावणी घेण्याचा आग्रह न्यायालयात केला. ‘देशमुख यांना अटकेपासून संरक्षण देण्यासाठी गुरुवारीच सुनावणी होणे आवश्यक आहे,’ असे चौधरी यांनी म्हटले. ईडी खालच्या पातळीचे डावपेच आखत आहे. ही याचिका असहाय्यता दर्शवते. ईडीने केलेले कृत्य निंदनीय आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.आम्ही २९ सप्टेंबरला सुनावणी घेऊ तेव्हा तुमचे सर्व मुद्दे ऐकू, असे न्यायालयाने म्हटले. आवश्यकता वाटल्यास ईडीने त्यांचे उत्तर सादर करावे, असेही न्यायालयाने म्हटले. अँटालिया स्फोटक व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या जबाबावरून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाझे याने दिलेला जबाब चुकीचा असून त्याने कुहेतूने आपल्यावर आरोप केले आहेत, असे देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे. वाझेने बार मालकांकडून वसूल केलेले ४.७० कोटी रुपये देशमुख यांनी आपल्या कंपनीत वळवल्याचा ईडीने केलेला आरोपही देशमुख यांनी फेटाळला.

काय म्हटले याचिकेत?पदाचा गैरवापर करून मिळवलेले पैसे देशमुख यांनी त्यांच्या नागपूरमधील श्री साई शिक्षण संस्थेमध्ये वळवले. वाझेने ज्यावेळी बार व रेस्टॉरंट मालकांकडून पैसे वसूल केले. त्याचकाळात देशमुख यांच्या शिक्षण संस्थेच्या खात्यात डोनेशन जमा झाले, असे ईडीने अर्जात म्हटले आहे. वाझेने दावा केल्याप्रमाणे कोणत्याही बार किंवा रेस्टॉरंट मालकांकडून पैसे घेतले नाहीत. तसेच तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनीच वाझेला पुन्हा सेवेत रुजू करून घेतले, असे देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालय