शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या नावाने घातला गंडा; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 21:26 IST

 ज्योतिकुमार अगरवाल असे अटक आरोपीचे नाव असून तो शीव येथील रहिवासी आहे.

ठळक मुद्देआरोपीने पीयूष गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल देखील बनवला होता. या प्रकरणातील तक्रारदार मनीष पटेल (54) हे पर्यावरण सल्लागार आहेत.सप्टेंबर 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीत गोयल यांना भेटवस्तू आणि इतर कारणांसाठी दीड लाख रुपये घेतले.

मुंबई - रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी हिटसंबंध असल्याचे सांगून त्यांच्यामार्फत 'सतत' या योजनेत कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्यासाठी आरोपीने पीयूष गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल देखील बनवला होता. ज्योतिकुमार अगरवाल असे अटक आरोपीचे नाव असून तो शीव येथील रहिवासी आहे.

या प्रकरणातील तक्रारदार मनीष पटेल (54) हे पर्यावरण सल्लागार आहेत. याबाबत माटुंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल हा पटेल यांचा मित्र आहे. त्याने आपले पीयूष गोयल यांच्याशी चांगले संबंध असल्याची बतावणी करून त्यामार्फत 'सतत' या योजनेंतर्गत 50 ते 75 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे सप्टेंबर 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीत गोयल यांना भेटवस्तू आणि इतर कारणांसाठी दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर पीयूष गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून स्वतःला ई-मेल पाठवला व हाच ई-मेल पुढे आरोपीने पटेल यांना पाठवला. तसेच १ लाख 75 हजार रुपयांचे एनइएफटी केल्याचा मेसेजही तक्रारदाराला पाठवला. त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी तिसऱ्या मित्राच्या मदतीने गोयल यांच्या कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी ही फसवणूक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार पटेल यांनी याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अगरवालला अटक केली. 

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिसrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल