शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्सिस बँकेतील २५ खातेदारांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 03:37 IST

वसई रोड पश्चिमेच्या अ‍ॅक्सिस बँकेतील पंचवीस ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.

वसई : वसई रोड पश्चिमेच्या अ‍ॅक्सिस बँकेतील पंचवीस ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. ही रक्कम थेट गाजियाबादच्या एटीएम मशीनमधून काढण्यात आल्याचे समजते.शुक्रवारी देखील अशाचप्रकारे रक्कम काढण्यात आल्याची माहिती खातेदार राहुल सेहगल यांनी दिली. एटीएमच्या माध्यमातून २५ ग्राहकांच्या खात्यातून परस्पर रकमा काढण्यात आल्यावर या सर्वांनी अ‍ॅक्सिस बँक तसेच माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता आमच्याकडे फसवणूक झालेल्यांपैकी १० ते ११ खातेदार आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून आवश्यक माहिती तसेच तक्रार अर्ज घेऊन आम्ही हे प्रकरण सायबर सेलकडे पाठवले आहे. तेथून सखोल चौकशीअंती या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.वसई रोड पश्चिमेच्या अ‍ॅक्सिस बँकेतील ग्राहकांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे मेसेज गुरुवारी सकाळी आले. तसेच ही रक्कम थेट गाजियाबाद येथील ए.टी.एम.मधून काढण्यात आल्याचे ग्राहकांना समजल्यावर फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांनी थेट बँकेच्या शाखेत धाव घेतली. २५ जणांची दिवसभरात साधारण एकाच पद्धतीने अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. काहींच्या खात्यातून ३८ हजार, ४० हजार, १ लाख १० हजार, २१ हजार, १२ हजार असे २५ जणांच्या खात्यातून साधारण कोट्यवधी रुपये हडप करण्यात आल्याचा अंदाज आहे. यातील चार ते पाच जणांच्या रकमा लाखांच्या घरात आहेत.दरम्यान, या फसवणूक झालेल्या सर्वांनी प्रथम बँकेच्या व्यवस्थापकाला जाब विचारला असता बँकेने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वैतागून ग्राहकांनी गुरुवारी सायंकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण सायबर गुन्ह्यांतर्गत येत असल्याने हे प्रकरण आधी सायबर सेलकडे जाऊन त्यांची शहानिशा करण्यात येईल.अ‍ॅक्सिस बँकेच्या एकाच शाखेतील २५ जणांच्या खात्यातून आणि गाजियाबाद येथील एकाच एटीएममधून दोन दिवस लाखो रुपये काढण्यात आल्याने ग्राहकांनी बँकेच्या व्यवस्थापनावर संशय व्यक्त केला आहे. आमची गेलेली रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी