लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) - मंगरूळपीर शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलिसांनी ८ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला.मंगरूळपीर शहरातील एका १५ वर्षीय पिडीत मुलीने पोलिसांत तक्रार दिली की, ती सायंकाळी साडेसहा वाजता तिच्या मैत्रिणीसोबत शिकवणीहून घरी जात असतांना नासरजंग चौकाजवळ आरोपी समिरोद्दीन अलिमोद्दीन रा. मानोरा रोड मंगरुळपीर हा मागून आला व हात धरून ‘चिठ्ठी’ देत होता. अशा प्रकारच्या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३५४ अ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, २०१२ कलम ९ (एल), १० अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहरसिंग जाधव करीत आहेत. दरम्यान, मंगरूळपीर शहरात शिकवणीला जात असताना किंवा शाळा, महाविद्यालयात जाणाºया मुलींची छेडखानी होऊ नये म्हणून चिडीमार विरोधी पथक सक्रिय करणे गरजेचे ठरत आहे.
मंगरूळपीर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:06 IST