शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

भोसरी परिसरातील सनी गुप्ता टोळीवर मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 20:27 IST

आरोपी भोसरी परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून गुन्हे करत होते..

पिंपरी : भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता याच्या टोळीवर पिंपरी-चिंचवडपोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई केली. याबाबतचे आदेश आज (मंगळवारी) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले.  टोळीप्रमुख सनी उर्फ सँडी कन्हैयालाल गुप्ता (वय २४, रा. मोशी), गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (वय ३२, रा. भोसरी), शशिकांत कन्हैयालाल गुप्ता (वय २०, रा. मोशी), विकास शामलाल जैसवाल (वय १८, रा. भोसरी), शिवाजी किसन खरात (वय २३, रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.   पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोसरी परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून गुन्हे करत होते. यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते. याबाबतचा प्रस्ताव भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्फत सादर केला. हा प्रस्ताव पारित करण्यात आला असून सनी गुप्ता टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले.   ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, अनिकेत पाटोळे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय