शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

251 रुपयांना स्मार्टफोन विकणाऱ्या मोहित गोयलला पुन्हा अटक, बलात्कार पीडितेला धमकी दिल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 12:08 IST

'Freedom 251' स्मार्टफोन प्रकरणात मोहित गोयलविरोधात फसवणुकीशी संबंधित 48 गुन्हे दाखल करण्यात आले.

नवी दिल्ली: पाच वर्षांपूर्वी 251 रुपयांना स्मार्टफोन देण्याची स्कीम आणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मोहित गोयलला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी मोहितवर बलात्कार पीडितेला धमकी दिल्याचा आरोप आहे. मोहित गोयल व्यतिरिक्त आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांवर बलात्कार पीडितेला एका वर्षांपासून धमकी दिल्याचा आरोप आहे. मोहित व्यतिरिक्त आणखी दोन आरोपी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात सुमित यादव आणि विनीत कुमार यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण ?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मित्तल नावाच्या एका व्यक्तीवर महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. तो त्या प्रकरणातून जामीवार बाहेर आला होता. पण, 2020 मध्ये पीडित महिलेला तक्रार परत घेण्यासाठी फोनवरुन धमकी देण्यात आली. ही धमकी विकास मित्तलच्या नावाने देण्यात आली. महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी विकासला अटक केली. पण, त्यानंतरही महिलेला वारंवार धमक्या मिळू लागल्या. 

पोलिसांनी तपास केला असता, मोहित गोयल, सुमित यादव आणि विनीत कुमार या तिघांनी महिलेला धमकी दिल्याचे उघड झाले. तपासात समोर आले की, मोहित गोयल आणि विकास मित्तलचे व्यवसायिक वाद होते आणि याच वादाचा बदला घेण्यासठी मोहितने विनीत आणि सुमितसोबत मिळून विकासच्या नावाने महिलेला धमक्या दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी विनीत कुमारला गुरुग्राममधून पकडलं. त्याने पीडितेला धमकी दिल्याची कबुली दिली आणि मोहित गोयल आणि सुमित यादव यांची नावे घेतली. या आधारावर गोयलला नोएडा आणि यादवला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.

Freedom 251 होते फोनचे नावशामली येथील रहिवासी मोहित गोयलने रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी सुरू केली आणि केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत फक्त 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली होती. त्या फोनचे नाव 'Freedom 251' असे ठेवले होते. पण, ही स्कीम फेल ठरली आणि कंपनीकडून अनेकांची फसवणूक करण्यात आली. यानंतर गोयलविरुद्ध फसवणुकीशी संबंधित 48 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याला अटकही करण्यात आली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभाग