शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ले टाळण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’

By योगेश पांडे | Updated: December 13, 2024 00:20 IST

देशभरात शंभराहून अधिक ड्रील्स : गोपनीय माहितीच्या रक्षणासाठी ‘सायबर सिक्युरिटी’वर भर

नागपूर : मागील काही काळापासून शासकीय यंत्रणेवरदेखील सायबर हल्ल्यांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर गोपनीय माहिती देशविघातक तत्त्वांच्या हाती लागू शकते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनातर्फे शासकीय विभागांमधील ‘सायबर’ सुरक्षेची नियमित तपासणी करण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’ची सुरुवात करण्यात आली आहे. देशभरात अशा प्रकारच्या शंभराहून अधिक ड्रील्स करण्यात आल्या आहेत.

‘सर्ट इन’तर्फे (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) हा देशपातळीवर पुढाकार घेण्यात आला आहे. हा स्वयंचलित सायबर सुरक्षेशी संबंधित एक्स्चेंज प्लॅटफॉर्म असून विविध क्षेत्रात सायबर हल्ल्यांच्या घटनांचे विश्लेषण करण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत आहे. ‘सर्ट ईन’तर्फे सरकारी विभागांमधील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी नियमितपणे मॉक ड्रील्सची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. 

विशेषत: गोपनीय माहिती असलेल्या विभागांशी संदर्भात हा पुढाकार घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशपातळीवर अशा १०४ ‘मॉक ड्रील्स’ घेण्यात आल्या आहेत. यात विविध राज्यांतील १ हजार ४५० संस्थांना सहभागी करून घेण्यात आले होते. या माध्यमातून काही विभागांतील मोठ्या त्रुटी व संभाव्य सायबर धोकेदेखील समोर आले आहेत.

साडेनऊ हजारांहून अधिक अधिकारी ‘सायबर एक्सपर्ट’शासकीय विभागांच्या नेटवर्क प्रणालीत कार्यरत असलेल्या सरकारी व निमसरकारी संस्थांमधील नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर तसेच ‘चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर्स’चा ‘डेटा बेस’ तयार करण्यात आला आहे. संवेदनशील विभागांमधील आयटीसंदर्भातील यंत्रणा मजबूत करणे तसेच सायबर हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘सर्ट इन’कडून संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत देशभरातील अशा ९ हजार ८०७ अधिकाऱ्यांना सायबर सिक्युरिटीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे अधिकारी ‘एक्सपर्ट’ व्हावे यादृष्टीनेच हे प्रशिक्षण मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत.

धोकादायक संगणक ‘प्रोग्राम्स’वरदेखील प्रहार‘सर्ट इन’कडून केवळ सरकारी यंत्रणाच नाही तर जनसामान्यांमध्येदेखील सायबर जागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ‘सर्ट इन’तर्फे राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य सायबर धोक्यांबाबत या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. विशेषत: विविध ‘मॅलिशिअल प्रोगाम्स’ व सॉफ्टवेअर शोधून त्यांना संगणक यंत्रणेतून दूर करण्यासाठी ‘सर्ट इन’कडून सायबर स्वच्छता केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. मुळात हे केंद्र तांत्रिकदृ्ट्या ‘बॉटनेट क्लिनिंग ॲन्ड मालवेअर ॲनालिसीस सेंटर्स’ आहेत. धोकादायक प्रोग्राम्स हटविण्यासाठी या केंद्राकडून ‘टूल्स’देखील उपलब्ध करून देण्यात आले असून सामान्य नागरिकदेखील त्याचा लाभ घेऊ शकतात, हे विशेष. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम