शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱ्यास मुंबईत अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 18:24 IST

या चोरट्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले

ठळक मुद्देमोबाईल व रोकड पळवणाऱ्या टोळीतील चोरट्याला कांदिवली परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ ने बेड्या ठोकण्यात आल्या.शिवाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार रुपयांचे ४ मोबाईल आढळून आले.हे मोबाईल सुरत येथे चोरल्याची माहिती चौकशीदरम्यान शिवा याने दिली.

मुंबई - गुजरात राज्यातील सुरत येथे मोबाईल दुकानाचे टाळे तोडून मोबाईल व रोकड पळवणाऱ्या टोळीतील चोरट्याला कांदिवली परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ ने बेड्या ठोकण्यात आल्या. या चोरट्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याला पुढील तपासासाठी सुरतमधील स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मूळचे नवी दिल्लीत राहणारे चोरटे कॅटरिंगमध्ये वाढप्याचे काम करतात. ही टोळी जेथे जाईल तेथे दुकानांवर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी डल्ला मारत होती. अशा प्रकारे या टोळीने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बंद दुकानाचे शटर उचकटून २० मोबाईल व रोकड पळवली. या प्रकरणी दुकान मालकाच्या फिर्यादीवरून सुरत (राज्य गुजरात) येथील लिंबायत पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३८०, ४५४, ४५७  नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या टोळीतील एक चोरटा मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानक येथे चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ११ च्या पथकाला प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे आज पोलीस पथकाने सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार तेथे एक इसम आला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव शिवा ऊर्फ संतोष रामदास गौतम (२४) असे सांगितले.शिवाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार रुपयांचे ४ मोबाईल आढळून आले.हे मोबाईल सुरत येथे चोरल्याची माहिती चौकशीदरम्यान शिवा याने दिली.या चोरट्याला गुन्हे शाखा कक्ष १ चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय शास्त्री, गुन्हे शाखा कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन उतेकर, अंमलदार अविनाश शिंदे, सुधीर कोरगावकर, विनायक साळुंखे, रवींद्र भांबिड, सत्यनारायण नाईक, नितीन शिंदे, दीपक कांबळे, राजू गारे, संतोष माने, राकेश लोटणकर, महादेव नावगे, सचिन कदम, अजित चव्हाण, महिला अंमलदार रिया आनेराव आदी पथकाने अटक करण्यात उत्तम कामगिरी केली.

टॅग्स :RobberyचोरीMobileमोबाइलArrestअटकGujaratगुजरातSuratसूरत