शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल हिसकावून चोरी करणारी टोळी गजाआड , पार्कसाइट पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 02:39 IST

काही दिवसांपूर्वी मोहम्मद खान याचा महागडा मोबाइल दोघा जणांनी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला होता. यावेळी पार्कसाइट पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दुचाकी चालवणारा आरोपी युसूफ हैदर अली शेख यास अटक केली होती.

मुंबई - रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांचे फोन हिसकावून पळ काढणारी टोळी गजाआड झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये ही टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती. परंतु विक्रोळी पार्कसाइट पोलिसांना या टोळीला पकडण्यात यश आले आहे.काही दिवसांपूर्वी मोहम्मद खान याचा महागडा मोबाइल दोघा जणांनी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला होता. यावेळी पार्कसाइट पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दुचाकी चालवणारा आरोपी युसूफ हैदर अली शेख यास अटक केली होती. त्यानंतर दुसरा पळून गेलेला आरोपी नावेद शेख यास मानखुर्दमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता एक टोळी मुंबईसह उपनगरात पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेऊन त्यांचा आय.एम.ई.आय. नंबर बदलून विकत असल्याचे समोर आले.

हे चोरलेले मोबाइल संगणकातील सॉफ्टवेअरच्या मदतीने आय.एम.ई.आय. नंबर बदलून विकण्यात येत होते. यामध्ये मोहम्मद शेख, इक्बाल खान, सलमान आदिल, अहमद सिद्धीकी व साबीर खान यांचा हात होता. पोलिसांनी यातील साबीर खान याच्या शिवाजीनगर येथील दुकानावर छापा टाकला असता त्यांना या दुकानात चोरलेले ४८ महागडे मोबाइल एक हार्डडिस्क, दोन संगणक तसेच दोन गुन्ह्यांतील दुचाकी मिळाल्या. याची एकूण किंमत अंदाजे २ लाख ६६ हजार ५०० रुपये इतकी आहे. या आरोपींवर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीने अजून मोबाइल चोरून विकले आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई