पुणे : गुगल पेवरुन त्याने ३९९ रुपयांचा रिचार्ज केला होता. परंतु, रिचार्ज न झाल्याने त्याने रिफंडसाठी केलेला प्रयत्न त्याला सायबर चोरट्यांपर्यंत नेऊन सोडले व त्यांनी त्याच्या बँक खात्यातून ७७ हजार रुपये काढून घेऊन त्याला गंडा घातला.याप्रकरणी सोमनाथ बाबुशा खंडाळे (वय २८, रा़ पर्वती दर्शन) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना ४ जून रोजी दुपारी २ ते ३ दरम्यान घडली होती.याबाबत पोलिसांनी सांगितले की, खंडाळे यांनी त्यांचे मित्राचे मोबाईलवर गुगल पे द्वारे ३९९ रुपयांचा रिचार्ज केला होता.परंतु, रिचार्ज न झाल्याने त्यांनी रिफंडसाठी गुगल पे हेल्प लाईन नंबरवर कॉल केला. तो नेमका गुगल पे ऐवजी सायबर चोरट्यांनी इंटरनेटवर टाकलेला नंबर होता. समोरुन बोलणाऱ्या सायबर चोरट्याने खंडाळे यांना रिफंड मिळण्यासाठी एनि डेस्क हे अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर त्यांच्या एटीएमची डिटेल्स व ओटीपी नंबर घेऊन त्यांच्या बँक खात्याून एका पाठोपाठ ४ ट्रान्झेक्शन करुन ७७ हजार रुपये काढून घेऊन फसवणू केली.
मोबाईल रिचार्जचा रिफंड पडला ७७ हजार रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:30 IST