शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:56 IST

एक आरोपी मारहाणीचा व्हिडिओ बनवत होता तर 8-9 जण तरुणाला बेदम मारत होते.

महेंद्रगड: हरियाणातील महेंद्रगडमध्ये एका तरुणाला काही तरुणांनी अमानुषपणे लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय, ज्यात काहीजण एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.ही घटना 9 ऑक्टोबरची आहे, पण आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी महेंद्रगड पोलिसांनी 8-10 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी विक्की उर्फ ​​फुकरा याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांच्या रिमांडवर पाठवलंय. 

एक आरोपी व्हिडिओ बनवत होता, बाकीचे मारत होते

महेंद्रगड जिल्ह्यातील बवाना गावचा रहिवासी असलेला 18 वर्षीय गौरव यादव 9 ऑक्टोबर रोजी दुपारी महेंद्रगड येथून दुचाकीने घरी परतत होता. त्याला रवी, कॅप्टन, अजय आणि मोहनसह 10 पेक्षा जास्त तरुणांनी वाटेत मालदा गावातील कालव्याजवळ अडवलं. यानंतर त्याला काही कळायच्या आत सर्वांनी त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी एक आरोपी या मारहाणीचा व्हिडिओ काढू लागला तर इतर काहीजण गौरवला मारू लागले. यावेळी गौरव हात जोडून दयेची भीक मागत राहिला, पण आरोपींनी दया दाखवली नाही. आरोपींनी गौरवला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. यानंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर गौरवच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

जुन्या वादातून केली हत्यामिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी याच परिसरात गौरव आणि आरोपी रवी उर्फ ​​लंगडा यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याच गोष्टीचा राग मनात धरुन रवीने आपल्या साथीदारांसोबत गौरवला बेदम मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमध्ये रवी अमानुषपणे मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 3 वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाLynchingलीचिंग