शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

 महिलेची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराची जमावाकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 10:40 IST

महिलेची छेडछाड केल्याची पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करुन त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीत शनिवारी रात्री घडला.

 पुणे - महिलेची छेडछाड केल्याची पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीत शनिवारी रात्री घडला. अक्षय सोनावणे (वय २८, रा़ दरोडे वस्ती, वानवडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, अक्षय सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, मारामाऱ्याचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो महंमदवाडी येथील राजीव गांधी कॉलनीमध्ये गेला होता. दारुच्या नशेत त्याने तेथील एका महिलेशी वादावादी केली. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार दिली. ही गोष्ट अक्षय या समजल्यानंतर तो रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा राजीव गांधी कॉलनीत गेला. त्याने या महिलेच्या घरावर दगडफेक केली. तेथे पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी चिडलेल्या जमावाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो त्यांनाही शिवीगाळ करुन लागल्याने त्यातील ३ ते ४ जणांनी त्याला मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अक्षय सोनावणे याला तातडीने ससून रुग्णालयात नेले़ परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.अक्षय सोनवणे हा बाल गुन्हेगार असून  त्याच्यावर तेव्हा ११ गुन्हे दाखल होते. त्यानंतर आता त्याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले होते. नुकताच तो त्यातून सुटून आला होता. त्याच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले असून, वडिलांनी दुसऱ्या विवाह केला आहे. त्या व्हाईटनरचे व्यसन आहे. दारु पिणे, व्हाईटनर ओढल्यानंतर तो कोणाचेच ऐकत नाही.शनिवारी दुपारी तो मोटारसायकलवरुन जात असताना त्याचा एका महिलेशी वाद झाला. त्याची तक्रार त्या महिलेने पोलिसांना दिली. तेव्हा तो जवळच्या जंगलात पळून गेला होता. नशेत तो रात्री परत आला व त्या महिलेच्या घरावर दगडफेक करु लागला. तेव्हा जमलेल्या नागरिकांनी त्याला बांबु, काठ्याने मारहाण केली. त्याच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला.नागपूरमध्ये अशाच प्रकारची घटना यापूर्वी घडली होती. संतप्त जमावाने एका सराईत गुन्हेगाराला भर दिवसा रस्त्यावर मारहाण करुन त्याची हत्या केली होती. त्यानंतर पुण्यात असा प्रकार घडला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे