शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 17:28 IST

घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची धडपकड करीत अटक केली आहे.

ठळक मुद्देशहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी करीत लालचक्की चौकात काळे कपडे घालून निषेध केला. काही पक्ष पदाधिकाऱ्यांना उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदानंद नाईक उल्हासनगर - विधानसभा निवडणुक डोळयासमोर ठेवून भाजप सरकारने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडी चौकशीच्या आड अडचणीत आणण्याचा डाव आखल्याचा आरोप शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी करीत लालचक्की चौकात काळे कपडे घालून निषेध केला. तसेच घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची धडपकड करीत अटक केली आहे.उल्हासनगरातमनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कारवाई सुरू असल्याच्या पाश्वाभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कॅम्प नं 4 येथील लालचक्की चौकात मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन कदम, प्रदीप गोडसे आदी पक्ष पदाधिकारी काळे कपडे घालून एकत्र येत भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांची धडपकड करीत अटक केली. लोकसभा निवडणूक दरम्यान ई.व्ही.एम. मशीनसह अनेक प्रश्न मांडून भाजप सरकारची पोलखोल पक्ष प्रमुख राज  ठाकरे यांनी केली. हा राग मनात धरून भाजपा सरकारने, गेल्या 30 वर्षा पूर्वीचे कोहिनूर प्रकरण निकाली लागले असतानाही जुने प्रकरण विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा डाव खेळल्याचा आरोप बंडू देशमुख यांनी केला.भाजपा सरकारने चौकशीसाठी ईडी मार्फत पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावणे केल्याने ठाकरे सर्मथकांत संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी उल्हासनगर पक्ष प्रमुख बंडू देशमुख, ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हाध्यक्ष प्रदिप गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर कँम्प.न.चार येथील लालचक्की चौक परीसरात पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजपा-युती सरकारच्या विरोधात काळे कपडे परिधान करीत घोषणाबाजी केली. तसेच आक्रमक आंदोलन केले. दरम्यान विठ्ठल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या पोलीस पथकाने प्रदीप गोडसे, सचिन कदम, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मैनुद्दीन शेख,सागर चौहान, कळू थोरात, सुभाष हटकर अनिल गोधडे, राजेश महेश्वरी,जितू शेट्टी,हिरा महेश्वरी यांना अटक केली. तर काही पक्ष पदाधिकाऱ्यांना उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस