डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मुलाची आलिशान कार फोर्ड मस्तंग रात्री सव्वा अकराच्या सुमारास उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळांवर कोसळल्याने अपघात झाला. निळजे आणि दातीवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रिजवर हा अपघात झाला. या दरम्यान कोणतीही ट्रेन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
आदित्य यांना या अपघातात दुखापत झालेली नसून चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.