लखनौ - गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, राज्यातील अजून एका आमदारावरबलात्काराचा आरोप झाला असून, पीडित महिलेने उत्तर प्रदेशमधील ज्ञानपूर येथील आमदार विजय मिश्रा याच्याविरोधात एका महिलेने बलात्काराती तक्रार दिली आहे. सदर आमदाराने धमकावून २०१४ पासून आतापर्यंत अनेकदा आपले शारीरिक शोषण केले, असा आरोप या महिलेने केला आहे.पीडित महिलेने भदोहीमधील गोपिगंज पोलीस ठाण्यात आमदारा विजय मिश्रा याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. विजय मिश्रासह अन्य दोघांविरोधातही महिलेने तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी विजय मिश्रा, विष्णू मिश्रा आणि विकास मिश्राविरोधात तक्रार नोंदवली आहे.२०१४ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी गायिका असलेल्या या पीडित महिलेचे विजय मिश्रा याने पहिल्यांडा शोषण केले होते. दरम्यान, नवभारत टाइम्सशी संवाद साधताना पीडितेने सांगितले की, २०१४ मध्ये केलेल्या बलात्कारानंतर विजय मिश्रा सातत्याने तिचे शोषण करत आला आहे, तो व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी तगादा लावत असे. तसेच असे न केल्यास जिवे मागण्याची धमकी देत असे. व्हिडिओ कॉलवर विजय मिश्रा स्वत: न्यूड होत असे तसेच आपल्यावरही न्यूड होण्यासाठी जबरदस्ती करत असे, असा आरोपही या महिलेने केला.