शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:31 IST

Bihar Online Fraud : वारिसालीगंजच्या महिला आमदार अरुणा देवी यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद अखिलेश सिंह हे देखील 'इमोशनल ब्लॅकमेलिंग'चे बळी ठरले आहेत.

Bihar Online Fraud : बिहारमधील वारिसालीगंज परिसरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी 'इमोशनल ब्लॅकमेलिंग'ची नवीन पद्धत सुरू झाली आहे. वारिसालीगंजच्या महिला आमदार अरुणा देवी यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद अखिलेश सिंह हे देखील 'इमोशनल ब्लॅकमेलिंग'चे बळी ठरले आहेत. याबाबत त्यांनी वारिसालीगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

आमदार अरुणा देवी यांचे प्रतिनिधी शैलेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ९ वाजता अखिलेश सिंह यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणारा व्यक्ती त्यांच्या एका चुलत भावाच्या आवाजात बोलत होता. त्या व्यक्तीने आपल्या नातेसंबंधाबद्दल सांगत आपली आई रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या उपचारासाठी तातडीनं ५० हजार रुपयांची गरज आहे, असे अखिलेश सिंह यांनी सांगितले.

स्कॅनरद्वारे २५ हजार रुपये पाठवलेनातेवाइकांची अडचण समजून अखिलेश सिंह यांनी सांगितले की, सध्या खिशात २५ हजार रुपये आहेत. तुम्ही म्हणाल तर पाठवू शकतो. त्यावर फसवणूक करणाऱ्याने स्कॅनर पाठवून रक्कम ट्रान्सफर करण्याची विनंती केली. त्यानंतर अखिलेश सिंह यांनी स्कॅनरवर २५ हजार रुपये पाठवले. काही वेळाने त्यांना फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी संबंधित नातेवाईकाच्या घरी फोन केला. त्यानंतर त्याच्या आईचे पाच वर्षांपूर्वी निधन झाल्याचे समोर आले. यानंतर अखिलेश सिंह यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात अर्ज करून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे.

30 हजार रुपयांची आणखी एक फसवणूकबुधवारी कुंभी ब्लॉकमधील रहिवासी सुरेश सिंह यांचा मुलगा संजीत कुमार उर्फ ​​भोथू याची अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यालाही चुलत भावाच्या आवाजात फोन आला होता. फसवणूक करणाऱ्याने सांगितले की, आई रुग्णालयात दाखल आहे. ५० हजारांची तातडीने गरज आहे. त्यावर संजीतने ३० हजार रुपये त्याच्या स्कॅनरला पाठवले. फसवणूक करणाऱ्याने काही तासात पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, बराच वेळ होऊनही रक्कम परत आली नाही, तेव्हा संजीतने फोन केला. त्यावेळी फसवणूक करणाऱ्याने सांगितले की, त्याच्या खात्यातून ५० हजारांपेक्षा कमी रुपये ट्रान्सफर होत नाहीत, त्यामुळे आणखी ३० हजार पाठवा. त्यानंतर संपूर्ण रक्कम एकाच वेळी परत केली जाईल. त्यामुळे फसवणुकीचा संशय आल्याने संजीतने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम