शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 08:52 IST

एक लाखात ठरला व्यवहार, चौकडीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: कॉलेजसाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत एक लाखात राजस्थानमधील व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पार्क साईट पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. याप्रकरणी पार्क साईट पोलिसांनी मुलीसोबत लग्न  करणाऱ्या व्यक्तींसह तिची विक्री करणाऱ्या चौकडीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. हरविलेल्या मुलीचा मोबाइल बंद असल्याने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी मुलगी दादर रेल्वे स्टेशन येथे पुरुष व महिलेसह दादर हुबळी एक्स्प्रेस मध्ये चढताना दिसली. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरु केला. चौकशीत जोडप्याने मिरजचे तिकीट काढल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस पथकाने तत्काळ मिरज रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. २४ डिसेंबर रोजी मुलगी दोघांसोबत दुचाकीवरून जाताना दिसली. दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी तपास सुरु केला. दुचाकी संबंधित व्यक्तीने  दादर रेल्वे स्टेशन येथून लगेजद्वारे मिरजला नेल्याचे उघड झाले. दादर रेल्वे स्टेशन येथून लगेजद्वारे पाठविलेल्या मोटारसायकलबाबत सविस्तर माहिती मिळताच, संबंधित व्यक्ती आणि त्याच्या सोबतची महिला  २२  तारखेला चेंबूर येथे तिच्या पतीला भेटण्यासाठी आल्याचे उघड झाले.

१६ जानेवारी रोजी पथक तिच्या पती पर्यंत पोहचले. त्याच्याकडून मुलीसोबत असणारी महिला त्याची पत्नी सुनीता उर्फ सुधा मनोज जोशी (२४),  पत्नीचा मामा लडप्पा लक्ष्मण गोवी (३४) असल्याचे सांगितले. ते मूळचे कर्नाटकच्या हिरापूरचे रहिवासी आहे. त्यानुसार पथकाने कारवाई करत मुलीची सुटका केली.

या पथकाची कामगिरी

पार्क साईट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक मेर, तपास अधिकारी प्रमोद सानप, विकास पाटील आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.

औरंगाबादमधून मुलगी ताब्यात

सुनीता आणि तिच्या मामाने मुलीचे कर्नाटकच्या गणपती हरिश्चंद्र कांबळे (५०) यांच्या मार्फत राजस्थानच्या एका दुकानदारासोबत १ लाखाला विक्री करून लग्न लावून विक्री केल्याचे उघड झाले. त्यानुसार, पथक औरंगाबाद तसेच कर्नाटक येथे रवाना झाले. हरवलेली मुलगी आणि लग्न लावून दिलेला भावाराम पदमाराम माली यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेऊन पथक मुंबईत आले.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAurangabadऔरंगाबाद