शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

अर्धनग्न अवस्थेत बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 18:43 IST

मुलाच्या मृत्यूमागे घातपात असण्याची पोलीसांनी व्यक्त केली शक्यता

ठळक मुद्दे ७ वर्षीय मुलाचा मृतदेह आज (दि.१२) सकाळी वास्को पोलीसांना शहरातील कोसंबे इमारतीच्या मागच्या भागातील खुल्या जागेतून ताब्यात घेतला.धनू सोळंकी असे त्या मयत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने त्याच्या मृत्यू मागे घातपात असण्याचा संशय

वास्को - दक्षिण गोव्यातील वास्को शहरात देव दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने थाटलेल्या फेरीतून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलाचा मृतदेह आज (दि.१२) सकाळी वास्को पोलीसांना शहरातील कोसंबे इमारतीच्या मागच्या भागातील खुल्या जागेतून ताब्यात घेतला. धनू सोळंकी असे त्या मयत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने त्याच्या मृत्यू मागे घातपात असण्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत असून ह्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणे सर्व मार्गाने सध्या तपास करीत आहेत. बेपत्ता झाल्यानंतर ह्या मुलाचा खून करण्यात आलेला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पोलीसांनी त्याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवलेला असून शवचिकित्सक अहवाल मिळाल्यानंतरच यामागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.वास्कोत दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने थाटण्यात आलेल्या फेरीत धनू सोळंकी ह्या सात वर्षीय मुलाच्या कुटूंबाने धातूच्या वस्तू विकणारे दूकान घातले आहे. यामुळे तो आपल्या आईसहीत फेरीच्या काळात दुकानावर यायचा. रविवारी (दि.११) संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धनू दुकानाच्याच जवळ खेळत असताना अचानक तो गायब झाल्याचे त्याच्या आई तसेच मावशीला दिसून येताच त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. सुमारे दोन तास त्याचा शोध घेतल्यानंतर सुद्धा तो सापडला नसल्याने त्याच्या कुटूंबाने याबाबत वास्को पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली. वास्कोतील फेरीतून सात वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याचे पोलीसांना समजताच त्यांनी त्या मुलाचा फेरीत तसेच इतर ठिकाणी शोध घेण्यास सुरवात केली, मात्र त्यांना तो सापडला नाही. धनू कुठेच सापडत नसल्याने नंतर फेरीच्या विविध ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही ची फुटेज पोलीसांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तपासली असता तो त्यांना फेरीतील एका भागात दिसून आला. ज्या ठिकाणी धनू दिसून आला होता तेथे त्याला शोधण्यास पोलीस व कुटूंबातील सदस्य गेले, मात्र तेथे त्यांना तो सापडला नाही. पोलीस तसेच त्याच्या कुटूंबाच्या सदस्यांनी त्याचा शोध घेण्यास चालूच ठेवला. सोमवारी सकाळी शहरातील कचरा साफ करणाऱ्या एका इसमाला वास्कोतील कोसंबे इमारतीच्या मागे एका मुलाचा मृतदेह असल्याचे दिसून येताच त्यांनी त्वरित पोलीसांना माहीती दिली. पोलीसांनी वेळ न दवडता त्वरित घटनास्थळावर धाव घेतली असता हा मृतदेह सात वर्षीय धनू सोळंकी याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार त्या मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. त्या मुलाने घातलेली ‘पेंन्ट’ त्याच्या अंगावर नसल्याची माहीती पोलीसांनी दिली. कोसंबी इमारतीच्या मागे असलेल्या खुल्या जागेतून पोलीसांनी धनू याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे. मयत मुलाच्या डोक्याला जखम असल्याचे तपासणीत दिसून आल्याने त्याच्या मृत्यूमागे घातपात (खून) आहे की तो इमारतीत चढल्यानंतर खाली पडून मरण पोचला आहे याबाबत सध्या तपास चालू आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने ह्या मुलाच्या मृत्यूमागे घातपात (खून) असण्याची दाट शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत असली तरी शवचिकित्सक अहवाल पोलीसांना मिळाल्यानंतरच मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली.दरम्यान, सात वर्षीय धनू याचा खून करण्यात आला असावा असा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सदर मुलगा आपल्या कुटूंबासहीत मंगोरहील, वास्को भागात रहायचा अशी माहीती पोलीसांनी दिली. वास्को पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिसMissingबेपत्ता होणंDeathमृत्यूMurderखून