शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भिक्षेकऱ्याचे गायब झालेले पावणेदोन लाख मिळाले, अशी राबवली गेली शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 10:03 IST

वैद्यनाथ मंदिर परिसरात एका ८० वर्षांच्या भिक्षेकरी व्यक्तीजवळील जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली पिशवी अचानक गायब झाल्याचा प्रकार घडला.

 परळी (बीड) :   येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात एका ८० वर्षांच्या भिक्षेकरी व्यक्तीजवळील जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली पिशवी अचानक गायब झाल्याचा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी त्यांनी शहर ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याचा छडा लावत रोकड त्यांना मिळवून दिली. मोलमजुरी करून आणि भिक्षा मागून त्याने हे पैसे जमवले होते.  येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे हे भाविकांकडून भिक्षा मागत असतात. त्यांना दोन मुले, सुना, एक मुलगी असा परिवार आहे. मुले वीटभट्टीवर कामास आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांनी शहर पोलीस ठाणे येथे येऊन आपली पैशाची पिशवी गायब असल्याची तक्रार रडत केली होती. पोलिसांनी नाईकवाडे यांना सोबत नेऊन, ते कुठे बसत होते, कुठे झोपत होते, कुठे राहत होते, याची पाहणी केली. वैद्यनाथ मंदिराजवळील रामनगर तांडा येथे छोट्याशा खोलीत ते राहतात. त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, काही किलोमीटर अंतरावर एक पिशवी आढळून आली. त्यातील पैसे मोजले असता, १ लाख ७२ हजार रुपये असल्याचे आढळून आले. त्यामध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा होत्या. ही सर्व रक्कम नाईकवाडे यांना सहायक पोलीस निरीक्षक पालवे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, पैशाची पिशवी कशी गायब झाली, याचे कोडे मात्र कायम आहे.

टॅग्स :MONEYपैसाBeedबीड