शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या 'त्या' तरुणाने आत्महत्याच केली!; पोलिसांनी दिली अधिकृत माहिती

By धीरज परब | Updated: September 12, 2022 20:52 IST

इमारतीच्या जिन्यावर आढळून आला होता तरुणाचा मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: येथील शांतीपार्क मधील एका इमारतीच्या जिन्यावर आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेह प्रकरणी ती हत्या नसून आत्महत्या असल्याचे पोलिसांनी अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. रेखा रिट्रीट इमारतीमध्ये मामाकडे राहणारा आर्यन सिंह ह्याचा मृतदेह त्याच इमारतीच्या जिन्यावर रविवारी सकाळी सफाई कामगारास दिसून आला होता. या घटनेने खळबळ उडून त्याच्या मामाने हत्येचा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल सह पोलीस अधीकारी व कर्मचारी यांनी विविध दिशेने तपास सुरु केला होता. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकास पाचारण केले होते. शिवाय गुन्हे शाखा युनिट १ चे पथक दाखल झाले होते. आर्यन याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या गळ्यावर फास घेतल्याची खूण होती. त्याशिवाय कुठेही झटापट वा मारहाणीची खूण नव्हती . आत्महत्याच्या अनुषंगाने लक्षणे आढळून आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

विजयसिंह बागल यांनी सांगितले की, आर्यन हा मामाच्या समोर राहणाऱ्या बाबूच्या घरी रात्री गेला होता. तेथील एका शयनगृहात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . त्या आधी  पहाटे ५ च्या सुमारास त्याने त्याच्या आई सह मित्र मैत्रिणींना संदेश पाठवून आय एम सॉरी असे म्हटले होते. आर्यन याने आत्महत्या केल्याने घाबरलेल्या बाबू व त्याच्या मित्राने त्याचा मृतदेह बाहेर जिन्यावर आणून ठेवल्याचे चौकशीत समोर आल्याचे बागल म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडPoliceपोलिसMumbaiमुंबई