शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा: अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ तिच्या वाढदिवशी केला ‘व्हायरल’

By चैतन्य जोशी | Updated: September 18, 2022 16:51 IST

आर्वीच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, गाडगेनगर पोलिसांतून गुन्हा वर्ग

वर्धा: अल्पवयीन मुलीला आर्वी शहरातील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून तिचा अश्लील व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित करुन तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावर व्हायरल करुन मुलीची बदनामी करुन विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणाची तक्रार अमरावती येथील गाडगेनगर पोलिसात दाखल केली. मात्र, घटनास्थळ आर्वी शहरातील असल्याने हे प्रकरण आर्वी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.

अमरावती येथील अल्पवयीन मुलगी आर्वीत शिक्षणासाठी असताना सप्टेंबर २०२० मध्ये तिची ओळख गौरव नामक युवकासोबत झाली. त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिला आर्वी येथील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून स्वत:च्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढले. मुलीने त्यास हटकले असता आरोपी गौरवने तिला गप्प बसविले. १ सप्टेंबर २०२२ रोजी मुलीचा वाढदिवस असल्याने ती तिच्या कुटुंबियासोबत अमरावती येथील घरी असताना तिच्या चुलत भावाने मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर वर्षभरापूर्वी गौरवने काढलेला अश्लिल व्हिडीओ पोस्ट केला. तो व्हिडीओ आरोपी गौरव याने स्वत:च्या स्टेटसवर ठेवला होता. यामुळे मुलीची बदनामी झाली. अखेर मुलीने थेट अमरावती येथील गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून या बाबतची तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करुन सदर प्रकरण पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत आर्वी पोलिसांकडे वर्ग केले. आर्वी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पिदूरकर यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावतीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप