शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

टेबल टेनिस प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 13:39 IST

बारा वर्षीय मुलीला अश्लील दृष्टिकोनातून दररोज सर्वांगाला बॅड स्पर्श करून तिचा विनयभंग करणाºया प्रशिक्षकाविरुद्ध सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

ठळक मुद्देबारा वर्षीय मुलगी सहा वर्षांपासून राऊतवाडीतील टेबल टेनिस शिकविणारा महेंद्र कोठारी याच्याकडे जायची.महेंद्र कोठारी (५0) हा मुलीवर वाईट नजर टाकून होता. संधी मिळेल तेव्हा तो या मुलीसोबत अश्लील चाळे करायचा. तिच्या सर्वांगावर वाईट उद्देशाने स्पर्श करायचा; परंतु ही बाब मुलीने घरी सांगितली नाही.

अकोला : शहरातील क्रीडा क्षेत्रातील वातावरण अत्यंत कलुषित झाले आहे. एकापाठोपाठ क्रीडा प्रशिक्षकांकडून मुलींच्या लैंगिक शोषणाच्या, विनयभंगाच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी अशीच एक घटना उघडकीस आली. सहा वर्षांपासून टेबल टेनिसचे धडे घेण्यासाठी जाणाऱ्या बारा वर्षीय मुलीला अश्लील दृष्टिकोनातून दररोज सर्वांगाला बॅड स्पर्श करून तिचा विनयभंग करणाºया प्रशिक्षकाविरुद्ध सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बारा वर्षीय मुलगी सहा वर्षांपासून राऊतवाडीतील टेबल टेनिस शिकविणारा महेंद्र कोठारी याच्याकडे जायची. गत महिनाभरापासून प्रशिक्षक महेंद्र कोठारी (५0) हा मुलीवर वाईट नजर टाकून होता. संधी मिळेल तेव्हा तो या मुलीसोबत अश्लील चाळे करायचा. तिच्या सर्वांगावर वाईट उद्देशाने स्पर्श करायचा; परंतु ही बाब मुलीने घरी सांगितली नाही. प्रशिक्षकाच्या वर्तणुकीमुळे मुलीच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम झाला. ती घरी फारशी कोणाशी बोलायची नाही. सातत्याने चिडचिड करायची. ही तिच्या आईच्या लक्षात आल्यावर, तिने मुलीला विश्वासात घेतले आणि तिला विचारणा केली. तेव्हा मुलीने आपबिती कथन केली. प्रशिक्षकाकडून होत असलेला अत्याचार पाहून, आईला धक्काच बसला. आईने मुलीला सोबत घेऊन शुक्रवारी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले आणि टेबल टेनिस प्रशिक्षक महेंद्र कोठारी याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ)(१) सहकलम ११, १२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी महेंद्र कोठारी याला अटक केली.(प्रतिनिधी)

क्रीडा प्रशिक्षकाकडून अत्याचाराची चौथी घटनाक्रीडा प्रशिक्षकांमुळे क्रीडा क्षेत्राला काळिमा फासल्या जात आहेत. पालक या प्रशिक्षकांवर विश्वास ठेवून आपली मुले-मुली त्यांच्या ताब्यात सोपवितात; परंतु काही क्रीडा प्रशिक्षक गुरू-शिष्याच्या नात्याला कलंकित करण्याचे कृत्य करीत असल्याचे घडलेल्या घटनांवरून समोर येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलांतर्गत जिम्नॅस्टिक प्रशिक्षक मुकेश तुंडलायत याने दोन मुलांचे लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर कबड्डी प्रशिक्षक शुद्धोधन अंभोरे याने एका मुलीचे लैंगिक शोषण केले. आयएमए हॉलमध्ये वर्ग घेणाºया बॅडमिंटन प्रशिक्षक राहुल सरकटे यानेसुद्धा त्याच्याकडे बॅडमिंटन शिकण्यासाठी येणाºया युवतीचे लैंगिक शोषण केले होते. शुक्रवारी टेबल टेनिस प्रशिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. प्रशिक्षकांकडूनच कोवळ्या मुला-मुलींचे शोषण होत असेल, तर पालकांनी कुणावर विश्वास ठेवावा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग