शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिपमधून अल्पवयीन बनली कुमारी माता, वरूड तालुक्यातील घटना, आरोपी विरोधात गुन्हा दाखल 

By प्रदीप भाकरे | Updated: December 4, 2022 15:51 IST

यातील अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असून, गतवर्षी ती मजुरीसाठी वरूड तालुक्यात आली होती. वरूड तालुक्यातील एका शिवारात काम करत असताना तिची ओळख आरोपी रितेश याच्याशी झाली.

अमरावती - ‘लिव्ह इन रिलेशनशिपमधून एक अल्पवयीन मुलगी कुमारिका माता बनल्याची धक्कादायक घटना वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास आरोपी रितेश जगुशी सिरसम (२०, रा. ग्राम कोठिया बोरदई, ता. बैतूल, मध्यप्रदेश) याच्याविरूध्द बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरूड तालुक्यातील एका शिवारात ही घटना घडली आहे.

यातील अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असून, गतवर्षी ती मजुरीसाठी वरूड तालुक्यात आली होती. वरूड तालुक्यातील एका शिवारात काम करत असताना तिची ओळख आरोपी रितेश याच्याशी झाली. काही दिवसांनी ते शेतातील एका झोपडीमध्ये एकत्र राहू लागले. त्यादरम्यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. मार्च २०२२ मध्ये ती तिच्या घरी बैतुल जिल्ह्यात परत गेली. त्यावेळी तिने इकडे वरूड शिवारात घडलेली घटना कुटुंबियांपासून दडवून ठेवली. तर दुसरीकडे तिला प्रसववेदना सुरू झाल्याने तिच्या कुटूंबियाने तिला मध्यप्रदेशातील एका रूग्णालयात दाखल केले. 

तेथे तिने मुलीला जन्म दिला. तत्पुर्वी, संबंधित रूग्णालय प्रशासनाने मुलीच्या कागदपत्रांची तपासणी केली. ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याबाबत बैतुल जिल्ह्यातील आमला पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तेथे जाऊन पिडितेचा जबाब नोंदवला. त्यावेळी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना तिला गर्भधारणा झाल्याची बाब उघड झाली.

म्हणून गुन्हा वर्ग -बैतुल जिल्ह्यातील आमला पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद केली. मात्र, घटनास्थळ हे वरूड तालुक्यातील असल्याने तो गुन्हा तपासासाठी वरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ती केसडायरी प्राप्त होताच, वरूड पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी बैतुल जिल्ह्यातील आमला पोलीस ठाणे व पिडिताच्या घरी पोलीस पथक जाईल, अशी माहिती वरूड ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक बागडे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल