उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:41 IST2019-12-17T23:41:06+5:302019-12-17T23:41:08+5:30
आरोपीत शिक्षकाचा समावेश : हिललाइन पोलिसांची कारवाई

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तीन जणांना अटक
उल्हासनगर : कॅम्प नंबर ५ परिसरात राहणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तिघांना अटक केली असून, आरोपींपैकी एकजण चक्क शिक्षक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरातील पीडित मुलीचे ७ डिसेंबर रोजी अपहरण झाल्याची तक्र ार हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलीस तपास सुरु असताना पीडित मुलगी १५ डिसेंबर रोजी कल्याण परिसरात मिळून आली. तिला बोलते केले असता, जिवे मारण्याची धमकी देऊन भोईर व प्रियकर असलेल्या सागर नावाच्या तरु णाने अपहरण करून विविध ठिकाणी अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. २२ जून रोजी ओळखीच्या जाधव नावाच्या मुलानेही अत्याचार केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी तिघांनाही सोमवारी रात्री अटक केली असून, मुलीवर मध्यवर्ती रु ग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया तिघांपैकी भोईर नावाचा आरोपी शिक्षक असल्याची माहितीही हिललाईन पोलिसांनी दिली.