शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 6 आरोपींना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 21:32 IST

मुंबई - दुधाच्या पिशवीत नळावरील पाण्याची भेसळ करून दुधाची विक्री करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या कक्ष 11 च्या पोलिसांनी मालाड क्वाँरी रोड येथून पहाटे अटक केली आहे. कृष्णा मल्लय्य अंबती(वय 49), अंजना नरसिम्मा मुतियाला ( वय 32), शंकर रच्चामल्ला (वय 19), सईदुल्ला अलिती (वय 35), सुजत मुतियला (वय 25),  रामुल्लमा राचमल्ला (वय 40) अशी या आरोपींची नावे आहेत. ...

मुंबई - दुधाच्या पिशवीत नळावरील पाण्याची भेसळ करून दुधाची विक्री करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या कक्ष 11 च्या पोलिसांनी मालाड क्वाँरी रोड येथून पहाटे अटक केली आहे. कृष्णा मल्लय्य अंबती(वय 49), अंजना नरसिम्मा मुतियाला ( वय 32), शंकर रच्चामल्ला (वय 19), सईदुल्ला अलिती (वय 35), सुजत मुतियला (वय 25),  रामुल्लमा राचमल्ला (वय 40) अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींजवळून पोलिसांनी छापा टाकून 429 दुधाच्या पिशव्या जप्त केले.

मालाडच्या क्वारीरोड परिसरात पहाटे काहीजण दुधाची भेसळ करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 11 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांना  मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून यी सहा जणांना दुधात भेसळ करताना रंगेहाथ अटक केली. हे सर्व जण गोकुळ, अमूल आणि आरे या दुधाच्या पिशवी फोडून त्यात पाण्याची भेसळ करत होते. पोलिसांनी या आरोपींजवळून 500 मिलीच्या 429 भेसळयुक्त दुधाच्या पिशव्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात 474/18 नुसार भा.दं.वि. कलम 272, 482,483,420, 468, 34 सह 7,16 या अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहेत. या टोळी मागे गोरेगावच्या एका मुख्य व्यक्तीचा हात असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmilkदूध