शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये मायलेकाचा विष प्राशनाने मृत्यू; मृत महिलेचा दीर गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 08:25 IST

राम हे दुचाकी आणण्यासाठी मित्र परमेश्वर चव्हाण सोबत गावी गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड :  भाईंदरच्या मुर्धा गावात कविता चव्हाण (२७) व तिचा मुलगा रोहित चव्हाण (८) यांचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला असून, कविता यांचा दीर श्याम चव्हाण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरगुती कारणातून फिनाईल पिऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून, पोलिस तपास करीत आहेत. मुर्धा गावातील राम मंदिराजवळ पांडे चाळीत राम विश्वनाथ चव्हाण (२९) हे पत्नी कविता व मुलगा रोहित यांच्यासह महिनाभरापूर्वीच भाड्याने राहायला आले. ते मूळचे सिंदखेडराजा येथील धानोरा गावचे आहेत. 

राम हे दुचाकी आणण्यासाठी मित्र परमेश्वर चव्हाण सोबत गावी गेले होते. शुक्रवार, १४ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते घरी परतले. बराच वेळ दार वाजवूनदेखील घराचा दरवाजा न उघडल्याने त्यांनी खिडकी जोरात ढकलली असता आतमध्ये रोहित हा निपचित पडलेला, तर पत्नी कविता जोरजोरात श्वास घेत अत्यवस्थ दिसली. राम व परमेश्वर यांनी दाराला धक्के मारून आतील कडी तोडली व दार उघडले.  त्यांनी दोघांना भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी रोहितचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर शनिवारी पहाटे कविता यांचाही मृत्यू झाला.कविता व राहुल यांनी काही विषारी द्रव्य घेतले आहे का, याची माहिती घेण्यासाठी पोलिस व राम हे घरी आले असता बाथरूममध्ये त्यांचा भाऊ श्याम (२७) हा बेशुद्धावस्थेत दिसला. त्यालाही जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्याम याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असून, त्याला शुद्ध आल्यावर घटनेची माहिती पोलिसांना जाणून घेता येईल. श्याम हा वसईत राहतो व खासगी क्लासमधून पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांना घरातून फिनाईलची बाटली मिळाल्याने रोहित याला फिनाईल पाजून नंतर कविता व श्याम यांनी फिनाईल पिऊन आत्महत्या केल्याची शक्यता तपासली जात आहे. 

विषबाधा की आत्महत्या?वरिष्ठ पोलिस निरीक्षक  मुगुट पाटील यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झाली की विष घेतले याबाबत शवविच्छेदन अहवालातून समजेल. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस