शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लेडीज बार चालकावर मध्यरात्री केला गोळीबार; चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:21 IST

घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कोनगाव पोलीस व भिवंडी गुन्हे शाखा हे समांतर तपास करीत आहेत.

 

भिवंडी - मुंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी कल्याण रस्त्यावरील रांजनोली नाका येथे स्वीट हार्ट लेडीज बार चालका वर रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने केला गोळीबार .जखमी बार चालकाचे नाव अमोल बोऱ्हाडे असं असून तो गोळी लागल्याने जखमी झाला आहे. त्यास ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोनगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.तालुक्यातील रांजनोली  ग्रामपंचायत हद्दीत स्वीट हार्ट नावाचे लेडीज बार असून सदरचा बार अमोल बोऱ्हाडे हे चालवत आहेत. २७ मेच्या मध्यरात्री नंतर अडीच वाजताच्या सुमारास अमोल बोऱ्हाडे हे सिगारेट पिण्यासाठी बारच्या मागील बाजूस येऊन उभे राहिले असता त्याठिकाणी आलेल्या अज्ञाताने त्यांच्यावर जवळून पिस्टल मधून गोळी चालविली. त्याच सुमारास अमोल बोऱ्हाडे हे मागे वळल्याने सदरची गोळी त्यांच्या उजव्या खांद्याच्या खालील बाजूने आरपार घुसुन समोरून बाहेर पडली .दरम्यान अमोल बोऱ्हाडे हे धावतच आपल्या बार मध्ये पळल्याने मारेकऱ्याने तेथून पळ काढला. राजनोली नाका परिसरात असलेल्या खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना उपचारासाठी ठाणे ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या  घटनेची माहिती मिळताच कोनगाव  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याचा पंचनामा केला आणि अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेतील अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कोनगाव पोलीस व भिवंडी गुन्हे शाखा हे समांतर तपास करीत आहेत. दरम्यान, हल्ला कोणी आणि का केला हे अजून कळलेले नसून व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसBhiwandiभिवंडी