शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीची वेबसाइट हॅक; ५०० कोटी रुपयांची मागितली खंडणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 09:35 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वेबसाईट हॅक करीत खंडणीची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली. मात्र, या धमकीला दाद न देता एमआयडीसीच्या तंत्रज्ञांनी पूर्ण डाटा मिळवत संपूर्ण संगणक यंत्रणा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

 मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वेबसाईट हॅक करीत खंडणीची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली. मात्र, या धमकीला दाद न देता एमआयडीसीच्या तंत्रज्ञांनी पूर्ण डाटा मिळवत संपूर्ण संगणक यंत्रणा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.२१ मार्च रोजी पहाटे रॅन्समवेअरचा सायबर हल्ला एमआयडीसीच्या संगणक प्रणालीवर केला. त्यामुळे सर्व संगणकीय व्यवहार ठप्प झाले होते. सर्व संगणकीय यंत्रणा बंद पाडत सायबर हल्लेखोरांनी एक धमकीचा संदेश पाठविला. तुम्हाला आधी विशिष्ट रक्कम भरावी लागेल, तरच तुमची वेबसाईट सुरू केली जाईल, अशी धमकी त्यात होती आणि एक विशिष्ट लिंक देऊन त्यावर संपर्क करण्यास सांगितले होते. ५०० कोटींची खंडणी मागितली होती, असा दावा काही चॅनेल्सनी केला. मात्र, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही रक्कम हल्लेखोरांनी नमूद केलेली नव्हती, असे ‘लोकमत’ला सांगितले. सर्व संगणकीय यंत्रणा पूर्वपदावर !nएमआयडीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगणकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नेटवर्कवरून संगणक खंडित केले. nमहामंडळाची एक खिडकी योजना, इआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भू-वाटप प्रणाली, पाण्याची देयके या यंत्रणांच्या बॅकअप फाईल्स वेगळ्या   नेटवर्कवर संग्रहित केल्या असून, त्या सर्व सुरक्षित आहेत.nमहामंडळाची वेबसाईट, एक खिडकी योजना, बीपीएएमएस या ग्राहकाभिमुख सेवा योग्य तपासणी करून चालू करण्यात आल्या आहेत. तसेच ईआरपी ही पाण्याची देयक यंत्रणा, आयएफएमएस या यंत्रणा ३१ मार्चपर्यंत पुन्हा कार्यान्वित होतील. सायबर हल्ला यशस्वीपणे परतविण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मदत घेत आहोत. सायबर गुन्हे शाखेला तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम