शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात भेटले, प्रेमात पडले, शरीरसंबंधांनंतर गर्भवती राहिल्यावर प्रियकर गेला सोडून, समोर आली Love-Sex-Dhokhaची धक्कादायक कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 12:36 IST

Crime News: या महिलेने सांगितले की, लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तिच्यासोबत पाच वर्षे शरीर संबंध ठेवले. दरम्यान, यावर्षी जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा हा प्रियकर तिला सोडून पळून गेला.

जयपूर - राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात एक महिला तिच्या २५ दिवसांच्या बाळाला घेऊन कायद्याच्या दारात पोहोचली आहे. या महिलेने लेखी तक्रारीमधून तिच्या प्रियकरावर अनेक आरोप केले आहेत. या महिलेने सांगितले की, लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तिच्यासोबत पाच वर्षे शरीर संबंध ठेवले. दरम्यान, यावर्षी जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा हा प्रियकर तिला सोडून पळून गेला. गेल्या १५ सप्टेंबर रोजी या महिलेने एका मुलाला जन्म दिला. आता या नवजात बाळाला घेऊन ही महिला दारोदार फिरत आहे. पोलीस ठाण्यात या महिलेने आरोपी प्रियकराविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच लवकरच आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी अजमेरमधील रामगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास सुरू केला आहे.

अजमेरच्या रामगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सतेंद्र सिंह नेगी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नेगी यांनी सांगितले की, चंद्रबरदाईनगर येथील पीडितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पीडितेने सांगितले की, जून २०१६ मध्ये अजमेर येथे झालेल्या विवाहादरम्यान, तिची ओळख हरियाणामधील अरुण चूग याच्याशी झाली होती. त्यानंतर दोघांमधील संपर्क वाढला. तसेच हळुहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर अरुणने तिला त्याच्यासोबत राहण्याची ऑफर दिली. तक्रारीतील उल्लेखानुसार महिलेने अरुणला सांगितले की, ती विवाहित आहे. तसेच पतीपासून वेगळी राहते. मात्र तिचा घटस्फोट झालेला नाहीत. तसेच तिला एक मुलगी असल्याचेही सांगितले. आरोपी अरुणने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले.

अरुणच्या भूलथापांना बळी पडून ही महिला आणि अरुण तिच्याच घरी एकत्र राहू लागले. अरुणने विवाहाचे आमिष दाखवून या महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अरुण या महिलेला सोडून गायब झाला, तसेच त्याने तिच्याशी असलेला संपर्क तोडला. या दरम्यान, या महिलेने अनेकदा त्याला फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. १५ सप्टेंबर रोजी पीडितेने एका मुलाला जन्म दिला. आता पीडितेने आरोपीविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान