शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूचे पार जर्मनीपर्यंत हादरे; मर्सिडीज बेंझने चिप काढून नेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 15:22 IST

ज्या कंपनीची ती कार होती, त्या मर्सिडीज बेंझ कंपनीत देखील मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीचे हेडक्वार्टर असलेल्या जर्मनीने या अपघाताच्या चौकशीत लक्ष घातले आहे. 

प्रसिद्द उद्योजक सायरस मिस्त्रींचे अपघाती निधन झाले आणि उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली. या अपघाताचा धक्का एवढा मोठा होता की गडकरींनी आठवडाभरातच नवीन नियम लालू करण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर ज्या कंपनीची ती कार होती, त्या मर्सिडीज बेंझ कंपनीत देखील मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीचे हेडक्वार्टर असलेल्या जर्मनीने या अपघाताच्या चौकशीत लक्ष घातले आहे. 

मर्सिडीजने या अपघाताची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. कारमध्ये एक चिप लावलेली असते, ती कंपनीने आपल्या ताब्यात घेऊन जर्मनीला पाठविली आहे. जर्मनीच्या मुख्यालयात या चिपमधील डेटाचे विश्लेषण केले जाणार आहे. हा अपघात कसा झाला आणि सात एअरबॅग असूनही तीनच कशा उघडल्या याचाही तपास केला जाणार आहे. आम्ही ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करणारा एक जबाबदार ब्रँड आहोत. आमची टीम शक्य असेल तेथे पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे. त्यांना आम्ही थेट उत्तर देऊ. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोले यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे, असे मर्सिडीजने म्हटले आहे. 

मर्सिडीज-बेंझच्या टीमने सोमवारी मिस्त्री यांच्या अपघात ग्रस्त कारची पाहणी केली. या कारमध्ये काही चिप बसविलेल्या असतात, त्या ताब्यात घेऊन विश्लेषणासाठी जर्मनीला पाठविल्या जाणार आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, "वाहनाची सर्व माहिती नोंदवणारी ही चिप विश्‍लेषणासाठी जर्मनीला नेण्यात येणार आहे. आठवड्याच्या अखेरीस त्याचा अहवाल येण्याची आम्हाला अपेक्षा आहे."

अपघाताच्या कारणाचे विश्लेषण करण्यासाठी डेटा डिक्रिप्ट केला जाईल. टायर प्रेशर, ब्रेक फ्लुइड, वेग, काही बिघाड, स्टीयरिंग व्हील कंडिशन, सीटबेल्ट आणि कारची एअरबॅग कंडिशन यांसारख्या गोष्टी देखील कंपनी तपासणार आहे. जगातील बहुतांश श्रीमंतांकडे या कंपनीच्या कार आहेत. मिस्त्री ही काही साधी असामी नव्हती. टाटा सन्सची धुरा य़ा व्यक्तीच्या एकेकाळी हातात होती. टाटा सारख्या कंपनीमध्ये मिस्त्रींच्या परिवाराची अब्जावधींची गुंतवणूक आहे. यामुळे मर्सिडीजने आपल्या नावाला कलंक लागू नये म्हणून ही चौकशी सुरु केल्याचे जाणकारांमध्ये बोलले जात आहे. 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीMercedes Benzमर्सिडीज बेन्झ