पुणे : वानवडी येथील १७ वर्षाच्या मानसिक रुग्ण युवतीचा गैरफायदा घेऊन तिला प्रेमाचे आमिष दाखवून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले़. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला़. याप्रकरणी वानवडीपोलिसांनी एकाला अटक केली आहे़. प्रकाश किसनलाल आहीर (वय २०, रा़ दळवीनगर, बी़ टी़ कवडे रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ त्याचा साथीदार अनिल हाफसे (रा़ बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याप्रकरणी या मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे़ फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी मानसिक रुग्ण आहे़ तिचा गैरफायदा घेऊन आहीर व हाफसे यांनी तिच्यावर २ नोव्हेबर २०१७ रोजी अत्याचार केला़. त्यानंतर एप्रिल २०१८ ते ४ मे २०१९ या दरम्यान या दोघांनी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला़. त्यातून ही युवती गर्भवती राहिली़ त्यानंतर हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात आला़. ..............धानोरी येथील १४ वर्षाच्या मुलीवर तिच्या चुलत भावाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला़. त्यातून ही मुली गर्भवती राहिली आहे़. सप्टेंबर २०१७ ते आतापर्यंत हा प्रकार घडला आहे़. धानोरीतील या मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे़ त्यांची मुलगी घरात एकटी असताना त्यांचा पुतण्या घरात येऊन आपण लग्न करु असे म्हणून तिच्यावर अत्याचार केले़. त्यातून ती गर्भवती राहिली़.. विश्रांतवाडी पोलिसांनी १८ वर्षाच्या पुतण्याला अटक केली आहे़.
पुण्यातील वानवडी येथे मानसिक रुग्ण युवतीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 16:21 IST