शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Mehul Choksi’s girlfriend:...तेव्हा 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबरिका समोरच होती; मेहुल चोक्सीने सांगितले ती कशी वागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:06 IST

Barbara Jabarica: कथितरित्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कट रचून अपहरण करत नंतर डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये मेहुलची 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबारिकाची (Barbara Jabarica) भूमिका खूप संशयास्पद आणि रहस्यमय आहे. मेहुल चोक्सीनेच आज मोठा दावा केला आहे. 

पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी (PNB Scam) फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी  (Mehul Choksi) कॅरेबियन बेटांवर आहे. त्याला कथितरित्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कट रचून अपहरण करत नंतर डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये मेहुलची 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबारिकाची (Barbara Jabarica) भूमिका खूप संशयास्पद आणि रहस्यमय आहे. मेहुल चोक्सीनेच आज मोठा दावा केला आहे. (Mehul Choksi names 'girlfriend' Barbara Jabarica in alleged abduction plot in police complaint)

Mehul Choksi’s girlfriend: मेहुल चोक्सीची 'ती' रहस्यमयी हॉट गर्लफ्रेंड कोण? समोर आले फोटो

मेहुल चोक्सीने अँटिगा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये याचा उल्लेख केला आहे. मला जबरदस्तीने मारहाण करण्यात आली आणि डॉमिनिकामध्ये नेण्यात आले. यामध्ये जबरिकाचा हात आहे. एवढेच नाही तर ते मारहाण करणारे लोक अँटिगाचे पोलिस होते, असा दावा केला आहे. गेल्या वर्षभरापासून माझे बार्बरा जबरिकाशी मित्रत्वाचे संबंध होते. 23 मे रोजी तिनेच मला तिच्या घरातून पिकअप करण्यास सांगितले होते. मी जेव्हा तिच्या घरी निघालो तेव्हा तिथे मला 8 ते 10 लोकांनी घेरले आणि मारले. हे लोक स्वत: अँटिगाचे पोलीस असल्याचे म्हणत होते. मला जबर मारहाण करण्यात आली. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि पाकिट काढून घेतले. आम्हाला तुला लुटायचे नाहीय असे सांगत त्यांनी पैसे मला परत केले, असे चोक्सी म्हणाला. 

जेव्हा मला मारहाण करण्यात येत होती, तेव्हा जबारिका तिथेच होती. मी तिला मदतीसाठी हाक मारली, परंतू तिने मला मदत करण्याचा किंवा कोणाला मदतीसाठी हाका मारण्याचा प्रयत्नही केला नाही. ती या वेळी ज्या पद्धतीने वागली त्यावरून या अपहरणामागे तिचा हात असल्याचे दिसत आहे, असा आरोप चोक्सीने केला. 

Mehul Choksi: महाराष्ट्राची लेडी सिंघम! मेहुल चोक्सीला धडकी भरवणाऱ्या शारदा राऊत डॉमिनिकात दाखल

अँटिगा पोलिसांनी अद्याप मेहुल चोक्सीच्या पत्रावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. जर तेथील पोलिसांनी यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर मेहुलच्या भारतवापसीला विलंब लागू शकतो. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPoliceपोलिस