शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

मेहता पिता-पुत्राची आत्महत्या शेअर मार्केट नव्हे तर वेगळ्याच कारणातून?; सुनेच्या दाव्याने नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 09:37 IST

शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्यानेच हरीश मेहता आणि त्यांचा मुलगा जय मेहता यांनी मृत्यूला कवटाळल्याचं बोललं जात होतं.

Mira Bhayandar ( Marathi News ) : भाईंदर रेल्वे स्थानकावर पित्रा-पुत्राने केलेल्या आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच समाजमन सुन्न झालं होतं. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्यानेच हरीश मेहता आणि त्यांचा मुलगा जय मेहता यांनी मृत्यूला कवटाळल्याचं बोललं जात होतं. मात्र या प्रकरणात आता हरीश मेहता यांच्या सुनेनं केलेल्या दाव्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

वसईच्या वसंतनगरी भागात राहणारे हरीश मेहता, त्यांचा मुलगा जय मेहता या दोघांनी सोमवारी भाईंदर रेल्वे स्थानकातून नायगावच्या दिशेने रेल्वे रुळावरून जात लोकलखाली आत्महत्या केली होती. वसई रेल्वे पोलिसांनी खात्री पटल्यानंतर मृतांची ओळख नमूद केली. मंगळवारी रात्री हरीश व जय यांचे मृतदेह नातलगांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, मेहता कुटुंबियांच्या घरातून पोलिसांना इंग्रजी भाषेत लिहलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत असे लिहिलेले आहे. त्यामुळे ही नेमकी आत्महत्या आहे की अन्य प्रकरण कोणते? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी देखील मयत मेहता यांचे बँक तपशील, ईमेल, मोबाईल तपासले असता त्यात कर्ज असल्याचे आढळून आले नाही.

सुनेनं काय म्हटलं आहे?

भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या पिता-पुत्राच्या आत्महत्येमागचे कारण वसई रेल्वे पोलिस शोधत आहेत. मुलाच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने कर्ज नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस मयत पिता पुत्राचे मोबाइल तपासत असून, अन्य निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे.

मोबाइलची तपासणी सुरू

पोलिसांनी जय आणि हरीश यांच्या मोबाइलची तपासणी चालवली असून, त्यात हरीश हे शेअर मार्केटचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, आत्महत्येबाबतचे ठोस कारण त्यातून निदर्शनास आलेले नाही. कर्ज वा कौटुंबिक वाद असल्याचे अजून तरी समोर आलेले नसून जय यांच्या पत्नीनेही कर्ज नसल्याचे सांगितले आहे. मेहता पिता-पुत्राच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, असे वरिष्ठ निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेshare marketशेअर बाजार