शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
6
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
7
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
8
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
9
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
10
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
11
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
12
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
13
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
14
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
15
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
16
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
17
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
18
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
19
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
20
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:17 IST

२०२५ मधील अत्यंत गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक म्हणजे मेरठचं सौरभ राजपूत हत्याप्रकरण.

२०२५ मधील अत्यंत गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक म्हणजे मेरठचं सौरभ राजपूत हत्याप्रकरण. या खळबळजनक प्रकरणात सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान हिच्यावर असा आरोप आहे की, तिने आपला बॉयफ्रेंड साहिल शुक्ला याच्यासोबत मिळून पतीची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये लपवले. पोलीस तपासानंतर मुस्कान आणि साहिल या दोघांनाही अटक करून मेरठ जिल्हा कारागृहात पाठवण्यात आलं, जिथे ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

चौधरी चरण सिंह विद्यापीठाचा एक विद्यार्थी नेता अक्षय बैंसला वादाच्या एका प्रकरणामुळे मेरठ जिल्हा कारागृहात पोहोचला. अक्षयला त्याच बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं होतं, जिथे सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील आरोपी साहिल शुक्ला बंद होता. अक्षयच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तो साहिलला ओळखू शकला नाही, कारण अटक झाली तेव्हाच्या तुलनेत तुरुंगातील साहिलचा चेहरामोहरा बराच बदलला होता. नंतर जेव्हा त्याला समजलं की हाच व्यक्ती सौरभ हत्या प्रकरणातील आरोपी आहे, तेव्हा दोघांमध्ये संवाद सुरू झाला.

अक्षयने सांगितलं की, २४ नोव्हेंबर रोजी आपल्या सुनावणीदरम्यान त्याला माहिती मिळाली की मुस्कानने एका मुलीला जन्म दिला आहे. जेलमध्ये परतल्यानंतर जेव्हा त्याने ही गोष्ट साहिलला सांगितली, तेव्हा साहिल म्हणाला की त्याला याबद्दल काहीही माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी जेव्हा जेलमध्ये वृत्तपत्र आलं, तेव्हा साहिलला कळालं की मुस्कानने मुलीला जन्म दिला आहे आणि तिला तिचं नाव 'राधा' ठेवायचं आहे. जेलमधील इतर कैद्यांनी साहिलचं अभिनंदन करत गंमतीने म्हटलं की, आता त्याने पार्टी दिली पाहिजे. यावर साहिलने उत्तर दिलं की, "आता तुम्ही सर्वजण काका झाला आहात आणि जेव्हा मी जेलबाहेर पडेन, तेव्हा सर्वांना पार्टी देईन."

अक्षयच्या म्हणण्यानुसार, संवादादरम्यान साहिलने असा दावा केला की त्याने सौरभ राजपूतची हत्या केलेली नाही. साहिलचे म्हणणं आहे की, या प्रकरणात असा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही जो हे सिद्ध करू शकेल की हत्या त्यानेच केली आहे. याच आधारावर आपल्याला शिक्षेतून सुटका मिळेल, अशी त्याला आशा आहे. सध्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता, येत्या काही दिवसांत या केसमध्ये निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband's killer Muskan becomes mother; Sahil celebrates in jail.

Web Summary : Muskan, accused of murdering her husband with her boyfriend Sahil, gave birth in jail. Sahil, also imprisoned, celebrated, telling inmates they were now 'uncles,' hoping for release due to lack of evidence.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगCourtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश