शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केला, पत्नीसोबत ४० मिनिट फोनवर बोलला, अन् उचलले टोकाचे पाऊलं; 'या' कारणासाठी होता डिप्रेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 15:42 IST

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. चार वर्षापूर्वी या तरुणाने आंतर जातीय विवाह केला होता.

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. चार वर्षापूर्वी या तरुणाने आंतर जातीय विवाह केला होता, त्या तरुणाची पत्नी मुस्लीम धर्माची असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाला मुलीच्या कुटुंबियांनी धर्मांतर करण्यासाठी तगादा लावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काल आत्महत्येपूर्वी तरुणाने आपल्या पत्नीशी ४० मिनिटे फोनवरुन चर्चा केल्याचे समोर आले आहे.

ही घटना मेरठच्या नौचंडी पोलीस ठाणे परिसरातील चित्रकूट कॉलनीची आहे, या ठिकाणी दुष्यंत नावाचा तरुण डीजे म्हणून काम करायचा. 4 वर्षांपूर्वी दुष्यंतची फरहा नावाच्या मुलीशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले आणि नंतर घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. 'दोघेही बरेच दिवस वेगळे राहत होते. लग्नानंतर सासरचे लोक त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होते. या दबावामुळे दोघेही वेगळे झाले, असा आरोप तरुणाच्या कुटंबियांनी केला आहे.  या दबावामुळे दुष्यंत बराच काळ डिप्रेशनमध्ये होता. मृत्यूपूर्वी दुष्यंतने पत्नी फरहाला फोन केला. दोघांमध्ये 40 मिनिटे बोलणे झाले, यानंतर दुष्यंतने आत्महत्या केली.

घर बंद करून गेले परगावी, इकडे चोरट्यांनी घर फोडले; कुंभारीत साडेतीन लाखांची चोरी

दुष्यंतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंदू संघटनाही आरोप केले आहेत. मेरठच्या हिंदू संघटनेच्या लोकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पत्नीच्या कुटुंबीयांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

कुटुंबियांनी अजुनही तक्रार दिलेली नाही.  धर्मांतरासाठी दबाव आणल्यासारखे आरोप होत असला तरीही अजूनपर्यंत कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस