शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:34 IST

एका वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून त्यांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

देशात सायबर गुन्ह्यांची प्रकरणं झपाट्याने वाढू लागल्याने डिजिटल अरेस्टसारखे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. यामध्ये एखाद्या व्यक्तीला मेंटली कंट्रोल केलं जातं, एका फोन कॉलने त्यांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये अशीच भयंकर घटना समोर आली आहे. डिजिटल अरेस्टद्वारे २८ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली.

एका वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून त्यांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. वृद्ध व्यक्तीला एक फोन आला आणि त्यांचं आधार कार्ड वापरून एक नंबर सुरू करण्यात आला असून त्याचा वापर हा चुकीच्या कामासाठी करण्यात येत असल्याचं सांगितलं. अशा पद्धतीने घाबरवून त्या व्यक्तीची मोठी फसवणूक करण्यात आली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मेरठच्या कंकरखेडा पोलीस स्टेशन परिसरात राहणारे सुरेश पाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ९ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख ज्युनिअर टेलिकॉम अधिकारी महेंद्र अशी सांगितली. सुरेश पाल यांच्या आधार कार्डवरून एक नंबर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना त्यावरून मेसेज पाठवून त्रास दिला जात असल्याचं कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितलं. 

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने सुरेश यांना सांगितलं की, दिल्लीत त्यांच्या नावावर एफआयआर नोंदवण्यात आला असून दिल्ली पोलीस मुख्यालयातून फोन केला जाईल. या कॉलनंतर सुरेश पाल यांना एक व्हिडीओ कॉल आला ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीने स्वतःची ओळख दिल्ली पोलीस मुख्यालयातील आयपीएस सुनील कुमार गौतम अशी करून दिली. 

सुमारे २ तास 3५ मिनिटं या वृद्धाला धमकावलं आणि मनी लाँड्रिंगची केस असल्याचं सांगितलं. व्हिडीओ कॉल करणाऱ्या व्यक्तीने हेच सांगून सुरेश पाल यांना २८ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितलं. जर तुम्ही निर्दोष असाल तर तुमचे सर्व पैसे हे तुम्हाला परत केले जातील असंही सांगितलं. सुरेश पाल यांनी दिलेल्या अकाऊंट नंबरवर पैसे ट्रान्सफर केले, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याप्रकरणी सुरेश पाल यांनी मेरठच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमMonkeyमाकड