शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'जाळीदार टोपी, हातात मांस...'; हिस्ट्रीशीटर आहे अयोध्येत तणावाचा कट रचनारा महेश मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:22 IST

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथे काही मंडळींनी जाळीदार टोपी ...

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथे काही मंडळींनी जाळीदार टोपी घालून धार्मिक स्थळांवर आक्षेपार्ह पत्रके आणि मांसाचे तुकडे फेकले. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. हा कट रचणारा आरोपी हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर आधीपासूनच चार गुन्ह्यांची नोंद आहे.

कोण आहेत आरोपी?संबंधित घटनेचा तपास घेत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर आणखी चार जणांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सर्वप्रथम दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. हे सर्व जण 'हिंदू योद्धा संघटने'शी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. महेश मिश्रा (मास्टरमाइंड), प्रत्यूष कुमार, नितिन कुमार, दीपक गौड, ब्रजेश पांडे, शत्रुघ्न आणि विमल पांडेय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यावर मशिदीबाहेर आक्षेपार्ह गोष्टी फेकून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हे लोक सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, असे काही करताना CCTV मध्येही दिसावे, अशी स्वतः आरोपीचीच इच्छा होती. यामुळेच त्याने संबंधित भागातील सीसीटीव्ही असलेल्या दोन मशिदींची निवड केली होती. याच बरोबर, महेश मिश्रा या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड होता. त्याने ब्रजेश पांडे नावाच्या वक्यक्तीच्या घरी यासंदर्भात प्लॅन आखला होता. एवढेच नाही, तर त्याने हे आक्षेपार्ह पत्रके लालबाग येथे छपले होते. तर आरोपी प्रत्यूष श्रीवास्तवने कुरान आणि टोपी विकत घेतली होती, असे पुलिसांनी म्हटले आहे.

याशिवाय, इतर आरोपींनी लालबागमधून मांस खरेदी केले होते. हे सामान 26 एप्रिलला घेण्यात आले आणि नंतर काश्मिरी मोहल्ला मशिदीत मांस आणि कुरान फेकण्यात आले. तसेच दुसऱ्या एका मशिदीत आक्षेपार्ह गोष्टी आणि मांस फेकण्यात आले, असेही पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांकडे चार तक्रारी आल्या होत्या. 

जहांगीरपुरीचा बदला घेण्याचा डाव! -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरीचा बदला घेण्याची आरोपींची इच्छा होती. आरोपींनी म्हटले आहे, की हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरी येथे हिंसाचार झाला, यामुळेच त्यांची ईदच्या दिवशी वातावरण खराब करण्याची इच्छा होती. सध्या त्यांच्यावर आयपीसी कलम 295 आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदांतर्गत (NSA) गुन्हा नोंदवला जाईल. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस