काशीमीरा येथे २५ लाखांचे एमडी जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 09:17 PM2020-12-22T21:17:27+5:302020-12-22T21:17:27+5:30

दहिसर चेकनाक्या जवळील ठाकूर मॉलसमोर चारचाकी मोटारीतून एक इसम एमडी हे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मीरा - भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाली होती .

MD worth Rs 25 lakh seized in Kashimira | काशीमीरा येथे २५ लाखांचे एमडी जप्त 

काशीमीरा येथे २५ लाखांचे एमडी जप्त 

Next

मीरारोड -  काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी (मेफोड्रोन) हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तस्करास मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याच्या कडून २५ लाख रुपये किमतीचे एमडी अमलीपदार्थ जप्त केले आहे . 

 

दहिसर चेकनाक्या जवळील ठाकूर मॉलसमोर चारचाकी मोटारीतून एक इसम एमडी हे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मीरा - भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाली होती . वनकोटी सह सहाय्यक निरीक्षक विलास कुटे व त्यांच्या पोलीस पथकाने साफळा रचला होता . माहिती नुसार वर्णनाची एक मोटार आली असता पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अमली पदार्थ आढळून आले . याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: MD worth Rs 25 lakh seized in Kashimira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.