शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

MBA पास करूनही मिळाली नाही चांगली नोकरी, पुष्पा सिनेमा बघून बनला चंदन तस्कर आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 10:56 IST

Crime News : असं सांगण्यात आलं आहे  की, सुमितचे वडील व्यवसाय करतात. सुमितनुसार, त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं. एमबीए केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला.

Crime News : उत्तर प्रदेश पोलिसांनी लाल चंदन तस्करीच्या आरोपात सात लोकांना मथुरा येथून अटक केली. यातील एक आरोपी एमबीए केलेला निघाला. त्याचं नाव आहे सुमित दास उर्फ संजू. तो छत्तीसगढच्या कांकोरचा राहणारा आहे. असं सांगण्यात आलं आहे की, 'पुष्पा द राइज' सिनेमातून प्रेरित होऊन तो या गॅंगमध्ये सामिल झाला होता. 

एसटीएफच्या सूत्रांनी मंगळवारी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये दीपक उर्फ दलवीर, अजित कुमार यादव, सुमित उर्फ राम, चंद्र प्रताप उर्फ बब्बू, सुमित दास, जितेंद्र आणि रंजीत यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितलं की, वन विभागाच्या टीमसोबत मिळून चालवण्यात आलेल्या या अभियानात 563 किलो चंदन ताब्यात घेण्यात आलं. ज्याची किंमत साधारण 2 कोटी रूपये आहे.

एमबीए शिकलेला बनला तस्कर

असं सांगण्यात आलं आहे  की, सुमितचे वडील व्यवसाय करतात. सुमितनुसार, त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं. एमबीए केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला. पण मनासारखी नोकरी कुठेच मिळाली नाही. काही लोकांनी नोकरीची ऑफर दिली, पण तिथे काम जास्त आणि पगार कमी होता. तरीही त्याने नोकरी केली. पण नंतर सोडली. अशात घरातील लोक त्याच्यावर नोकरीसाठी दबाव टाकत होते.

‘पुष्पा’ सिनेमा बघून आली आयडिया

सुमितने पोलिसांना सांगितलं की, तो पुष्पा सिनेमा बघायला गेला होता. तिथेच त्याला आयडिया आली की, कशी न शिकता कोट्यावधी रूपयांची कमाई केली जाऊ शकते. मग त्याने अशा गॅंगचा शोध घेणं सुरू केलं जे रक्त चंदनाची तस्करी करतात. आंध्र प्रदेशातील एका गॅंगची त्याला माहिती मिळाली. तो त्यांच्याकडून रक्त चंदन उत्तर प्रदेशच्या मथुरा,-वृंदावनमध्ये आणत होता आणि तो इथे चंदन सप्लाय करत होता. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सातही तस्करांची चौकशी केली जात आहे. तस्कर चंदनाची लाकडं गोवर्धन रोडवर गुलमोहर सोसायटीमध्ये उतरवणार होते. सोबतच चंदन कोण विकत घेणार होतं याची माहिती काढली जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी