शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर मौलानाचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:30 IST

धार्मिक स्थळाच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांची गर्दी आणि संताप पाहून आरोपी मशिदीच्या मागील दरवाज्यातून फरार झाला

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपीला इलियास (४८) यास लोनी गाझियाबाद येथून अटक केली. विशेष म्हणजे आरोपी विवाहित असून त्याचा 4 अपत्ये आहेत. 

नवी दिल्ली - उत्तर पूर्व दिल्लीच्या हर्ष विहार परिसरातील एका मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाणी भरायला आलेल्या लहान मुलीसोबत त्याने हे दुष्कृत्य केलंय. त्यानंतर, कुणालाही न सांगण्याची धमकीही दिली होती. मात्र, पीडित मुलीने घरी जाऊन घडलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे, परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

धार्मिक स्थळाच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांची गर्दी आणि संताप पाहून आरोपी मशिदीच्या मागील दरवाज्यातून फरार झाला. मात्र, पोलीत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला इलियास (४८) यास लोनी गाझियाबाद येथून अटक केली. विशेष म्हणजे आरोपी विवाहित असून त्याचा 4 अपत्ये आहेत. 

अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसमवेत हर्ष परिसरात राहते. आई-वडिलांसह इतरही सदस्य असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे. घरातील पाणी संपल्यामुळे ही मुलगी रविवारी संध्याकाळी शेजारी असलेल्या मशिदीमध्ये बादली घेऊन पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी, मशिदीत इलियास एकटाच होता, त्याने मुलीला पाहून एका खोलीत बोलावून नेले. त्यानंतर, तीला बांधून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना ठार करेल, अशी धमकीही दिली. मात्र, पीडितेनं तिच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितले. त्यानंतर, स्थानिकांनी एकत्र येऊन मशिदीवर गर्दी केली होती. 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली