शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मॅटर सॉल्व्ह कर दो, नहीं तो इधर ही बिठाके रखूंगा; आमदार सुर्वे यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:32 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यासह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावमध्ये एका व्यावसायिकाला मारहाण करत बंदुकीच्या धाकावर कार्यालयातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यासह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

यासंदर्भात सविस्तर तपशील असा की, गोरेगाव पूर्व परिसरात राहणारे व्यावसायिक राजकुमार सिंग यांची ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा. लि. ही कंपनी आहे. त्यांची कंपनी कर्ज देण्याचेही काम करते. मनोज मिश्रा याने त्याचे ‘आदिशक्ती’ यूट्यूब चॅनेल राजकुमार सिंग यांच्याकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. करारानुसार मिश्राकडून सिंग यांना पाच वर्षांनंतर ११ कोटी रुपये मिळणार होते. मात्र, चॅनेलच्या नावाने घेतलेली कर्जची रक्कम मिश्रा याने अन्यत्र गुंतवल्याने सिंग यांच्या कंपनीचे नुकसान होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सप्टेंबर, २०२२ पासून मिश्राने करार रद्द करण्यासाठी सिंग यांच्यावर दबाव आणला. 

बंदुकीच्या धाकावर सह्या बंदुकीचा धाक दाखवत एका स्टॅम्प पेपरवर करार रद्द करत असल्याचे लिहून घेत सही करण्यास सिंग यांना भाग पाडले. त्यानंतर, शेजारच्या रूममध्ये असलेल्या महिलांकडे बोट दाखवून खोटा गुन्हा दाखल करण्याचीही भीती त्यांना घालण्यात आली. शिवाय, याबाबत कुठे वाच्यता केल्यास पद्माकर नावाच्या व्यक्तीने मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचेही सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

सिंग यांचे अपहरण अन् धमकीn राजकुमार सिंग हे त्यांच्या कार्यालयात असताना बुधवारी दुपारी एका व्यक्तीने त्यांना दूरध्वनी करून ‘मैं प्रकाश सुर्वे के ऑफिस से बोल रहा हूँ. तुम अभी इधर आ जाने का’ म्हणत धमकावले. त्यांनी शनिवारी येतो सांगून कॉल कट केला. त्यानंतर, काही वेळातच १० ते १५ जणांनी कार्यालयात येत सिंग यांना मारहाण सुरू केली.n सिंग यांचे अपहरण करत आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर पूर्व येथील कार्यालयात त्यांना नेण्यात आले. त्यावेळी कार्यालयात राज सुर्वे आणि मनोज मिश्रा बसले होते. राज सुर्वे याने ‘मनोज मिश्रा का जो मॅटर है वो सॉल्व्ह कर दो, नही तो इधर ही बिठाके रखूँगा’, असे सांगितले. n त्यानंतर, काही वेळात राज याला कुणाचा तरी कॉल आल्याने सिंग यांना अन्यत्र हलविण्यासाठी धडपड सुरू झाली. सिंग यांना पोलिसांचेही कॉल सुरू झाले. मात्र, त्यावेळी त्यांनी सगळे ठीक असल्याचे सांगितले. n त्यानंतर, सिंग यांना जवळच्या एका इमारतीत नेण्यात आले. त्यांनी सुरुवातीला भीतीपोटी तक्रार दिली नाही. अखेर, रात्री उशिरा त्यांनी वनराई पोलिसांत तक्रार दाखल केली. 

मनोज मिश्रा याच्यासह तिघांना विमानतळाबाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य दोघे त्याचे मित्र असून यामध्ये त्यांचा काय सहभाग आहे त्यानुसार, पुढील कारवाई करण्यात येईल. - रामपियारे राजभर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वनराई पोलिस ठाणे 

टॅग्स :Prakash surveप्रकाश सुर्वेCrime Newsगुन्हेगारी