शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्यातील टीडीसी बँकेमधील सोने घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार जेरबंद, पत्नीसह झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:46 IST

Crime News : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या तब्बल चार वर्षांनंतर मुसक्या आवळल्या आहेत.

मोखाडा -  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या तब्बल चार वर्षांनंतर मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी पहाटे ५.०० वाजता हा सूत्रधार व त्याची पत्नी मोखाडा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मुख्य आरोपीसह त्यांच्या पत्नीला अटक केली असून त्यांना ४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांकडून या प्रकरणाचा कूर्मगतीने तपास सुरू होता. मोखाडा शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून उदयास आलेला हेमंत उदावंत हा अवघ्या काही वर्षांतच करोडपती झाल्याने तालुकाभर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच त्याच्या अमाप मायेचे बिंग फुटले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेतील २.७३ कोटीच्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याचा तो सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याने आपली पत्नी, शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित व बँकेचा व्हॅल्युअर चंद्रकांत बागुल, बँकेचा वॉचमन तसेच आपला वाहनचालक वसिम मणियार व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे मोखाडा शाखेत ५ किलो ३३७ ग्रॅम म्हणजे जवळपास २ कोटी ७३ लाखाचे बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले. परंतु त्याची परतफेड वेळेत न झाल्याने तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या १७ कर्जधारकांवर मोखाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु मुख्य सूत्रधार हा गेल्या चार वर्षांपासून फरार होता. त्याचे मोखाड्यात राजरोस येणे सुरू होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या असून या प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक झालेली आहे. एक आरोपी फरार असूून त्याचा तपास सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गवई यांनी सांगितले. 

बनावट सोने तारण  आरोपीने आपली पत्नी, शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित, बँकेचा व्हॅल्युअर चंद्रकांत बागुल, बँकेचा वॉचमन, आपला वाहनचालक व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी