शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सूत्रधार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:08 IST

Crime News : कल्याण पश्चिम भागात संदीप यांच्या ताब्यात एक जागा होती. ती जागा मायकल याला पाहिजे होती. यातूनच त्यांच्यात गेली अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

ठाणे :  उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करून डोक्यावर हल्ला करून, त्यांच्या खुनाचा प्रयत्नातील सूत्रधार संतोष रमेश ढवळे उर्फ मायकल (४८, रा. डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.कल्याण पश्चिम भागात संदीप यांच्या ताब्यात एक जागा होती. ती जागा मायकल याला पाहिजे होती. यातूनच त्यांच्यात गेली अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरमधील श्रीराम चौकातील एका बारमधून संदीप आणि त्याचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्यानंतर, ते त्या ठिकाणी रस्त्यावर गप्पा मारीत उभे होते. त्याच वेळी एका कारमधून आलेल्या हितेश ठाकूर (२३) आणि सागर शिंदे (२३) या दोघांनी गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून, गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात ते गंभीर जखमी झाले. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने २४ ऑक्टोबर रोजी हितेश आणि सागर या दोघांना नाशिक येथून अटक केली. त्यानंतर, २९ ऑक्टोंबर रोजी त्यांचा तिसरा साथीदार शाहरुख शेख यालाही अटक केली. यातील सूत्रधार मायकल हा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यालाही कोथमिरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने उल्हासनगर येथून १० डिसेंबर रोजी अटक केली.मायकल याने आपली अटक वाचविण्यासाठी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अखेर ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली. या अटकेनंतर या हल्ल्यामागील नेमका उद्देश स्पष्ट हाेण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर