शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मनोहर मामाच्या आश्रमात भक्त महिलेवर सामूहिक अत्याचार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 07:36 IST

साेलापुरात दोघांवर गुन्हा दाखल

सोलापूर : स्वत:ला संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत वावरणारा भोंदूबाबा मनोहरमामा भोसले याच्या उंदरगाव (ता. करमाळा) येथील आश्रमात एका भक्त महिलेवर सामूहिक अत्याचार  केल्याप्रकरणी भोंदूबुवासह दोघांवर अत्याचार, खंडणी तसेच जादूटोणा विरोधी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला . ‘लोकमत’मधून ‘बुवाबाजीचा पर्दाफाश’ होताच उंदरगाव आश्रमातील ‘मनोहर मामा’ राज्यभर गाजला. त्याच्याविरुद्ध असंख्य तक्रारी येऊनही कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नव्हता. मात्र, मंगळवारी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे साताऱ्याच्या एका महिलेने धाव घेतली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल झालेल्या फिर्यादीनुसार ही महिला या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले या महाराजाची भक्त होती. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये खास साताऱ्याहून त्याचे दर्शन घेण्यासाठी आश्रमात आली. तिच्या कौटुंबिक समस्या तिने या बुवाला सांगितल्या. तेव्हा त्याने एका चिठ्ठीवर चार पुरुषांची नावे लिहून या लोकांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असे स्पष्टपणे तिला सांगितले. तेव्हा तिने असा कोणताच प्रकार नसल्याचे स्पष्ट केले होते.  मात्र ‘मी खुद्द बाळुमामा बोलतोय. मला सगळं कळते’, असं या भोंदूबुवाने सुनावले. त्यानंतर तिचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी पाच अमावास्या मठात येऊन पूजा-दर्शन घेण्याचे आदेश दिले. दर अमावास्येला काळ्या कापडाची पूजा करण्यासाठी पंधरा हजारांचा दरही ठरला. पाच अमावास्येचे ७५ हजारही तिने वेळोवेळी दिले. त्यानंतर १ लाख ११ हजारांची देणगीही तिच्याकडून घेतली.

एवढे होऊनही तिची संकटे काही संपेनात, तेव्हा तिने पुन्हा मामाशी संपर्क साधला. तेव्हा तिला बारामतीच्या आश्रमात बोलावण्यात आले. मार्च २०२० मध्ये ती या आश्रमात गेली असता रात्री उशिरापर्यंत थांबून ठेवण्यात आले होते. 

मनोहर मामा भोसलेंसह बारामतीत तिघांवर गुन्हाबारामती (जि. पुणे) : कर्करुग्णास बरा करतो, असे सांगून बारामतीतील एकाची दोन लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यासह तिघांवर जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शशिकांत खरात (रा. साठेनगर, बारामती) यांनी या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार खरात यांच्या वडिलांना ‘थायरॉइड कॅन्सर’ हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजुबावी (ता. बारामती) मठामध्ये गेले. त्यांनी बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडिलांचा कर्करोग बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध दिले. 

टॅग्स :PoliceपोलिसSolapurसोलापूर